अग्निशमन व्यवस्थेची तपासणी सुरू - विनाेद खरात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 20, 2021 07:43 PM2021-01-20T19:43:54+5:302021-01-20T19:44:22+5:30

Buldhana News अग्निशमन व्यवस्थेची पाहणी सुरू करण्यात आल्याचे नगरपालिकेचे अग्निशमन अधिकारी विनाेद खरात यांनी ‘लाेकमत’शी बाेलताना सांगितले.

Firefighting probe underway | अग्निशमन व्यवस्थेची तपासणी सुरू - विनाेद खरात

अग्निशमन व्यवस्थेची तपासणी सुरू - विनाेद खरात

Next

बुलडाणा : भंडारा येथील जिल्हा सामान्य रुग्णालयात आग लागून दहा चिमुकल्यांचा मृत्यू झाला आहे. या पार्श्वभूमीवर बुलडाणा शहरातील शासकीय आणि खासगी रुग्णालये तसेच इतर कार्यालयांच्या अग्निशमन व्यवस्थेची पाहणी सुरू करण्यात आल्याचे नगरपालिकेचे अग्निशमन अधिकारी विनाेद खरात यांनी ‘लाेकमत’शी बाेलताना सांगितले.


फायर ऑडिट म्हणजे काय ?

फायर ऑडिट म्हणजे इमारतीमध्ये आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी असलेल्या यंत्रणेची पाहणी हाेय. यामध्ये स्प्रिंकलर, अलार्म पॅनल, स्माेक डिटेक्टर आदी आहेत किंवा नाही याची तपासणी केली जाते. तसेच इमारतीचा आकार पाहून तेथे असलेली व्यवस्था पुरेशी आहे किंवा नाही याचीही पडताळणी केली जाते.


अग्निराेधक सिलिंडरची वैधता किती असते ?

प्रत्येक इमारतीमध्ये लावण्यात येणाऱ्या सिलिंडरची साधारणता एक वर्ष वैधता असते. परंतु, त्यामध्ये प्रेशर किती आहे त्यावरून त्याची उपयाेगिता ठरते. सिलिंडरच्या वरच्या भागात त्याचे प्रेशर दर्शवते. त्यावरुन त्याची उपयाेगिता सिद्ध हाेते.


भंडाऱ्याच्या घटनेनंतर कायम उपाययाेजना केल्या ?

आपल्या शहरामध्ये भंडारा येथील घटना घडण्यापूर्वी पासूनच उपाययाेजना सुरू केलेल्या आहेत. यामध्ये शासकीय आणि खासगी रुग्णालयांना अग्निशमन यंत्रणेची तपासणी करण्याची सूचना करण्यात आली आहे. तसेच तेथे प्रत्यक्ष भेट देऊन पाहणी करण्यात येत आहे. तेथील कर्मचाऱ्यांना या यंत्राचा वापर कसा करावा,याविषयी माहिती देण्यात येत आहे.


पुढील नियाेजन काय आहे ?

मुख्याधिकारी महेश वाघमाेडे यांच्या मार्गदर्शनात शहरातील शासकीय आणि खासगी रुग्णालयांमध्ये अग्निशमन यंत्रणा सक्षम करण्यावर भर राहील. यासंदर्भात भेटी देणे सुरू असून त्यांच्याकडून यंत्रणा कार्यान्वित करून घेण्यावर आपला भर राहणार आहे.

Web Title: Firefighting probe underway

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.