पहिल्याच पावसात फुटला बंधारा; शेतीचे नुकसान

By admin | Published: June 17, 2017 12:17 AM2017-06-17T00:17:50+5:302017-06-17T00:17:50+5:30

शेगाव : तालुक्यात गुरुवारी रात्री झालेल्या संततधार पावसामुळे याच वर्षी बांधण्यात आलेला मनारखेड शिवारातील बंधारा फुटला.

First bumstrip in the first rain; Farm losses | पहिल्याच पावसात फुटला बंधारा; शेतीचे नुकसान

पहिल्याच पावसात फुटला बंधारा; शेतीचे नुकसान

Next


शेगाव : तालुक्यात गुरुवारी रात्री झालेल्या संततधार पावसामुळे याच वर्षी बांधण्यात आलेला मनारखेड शिवारातील बंधारा फुटला आहे. त्यामुळे या भागातील शेती आणि विहिरीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.
शेगाव तालुक्यात मागील चार दिवसांपासून पाऊस सुरू आहे. गुरुवारी रात्री पुन्हा जोरदार पाऊस पडल्याने तालुक्यात मनारखेड गट शिवारातील मागील वर्षी प्रशासनाच्यावतीने बांधण्यात आलेला सिमेंट बंधारा फुटला. त्यामुळे आलेल्या पुरात महादेव आनंदा हिंगणे रा. वरखेड बु. या शेतकऱ्याच्या साडेपाच एकर शेतात पाणी घुसले.
याशिवाय शेतात तयार करण्यात आलेली २२ बाय २२ विहिरीत पाणी भरल्याने तीही पूर्णपणे खचल्याने शेतकऱ्याचे लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे, तरी झालेल्या नुकसानाबाबत तहसील प्रशासनाने तत्काळ पंचनामा करून नुकसान भरपाई द्यावी, अशी मागणी सदर शेतकऱ्याने शासनाकडे केली आहे.

Web Title: First bumstrip in the first rain; Farm losses

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.