तंबाखूमुक्त शाळा अभियानात नायगाव दत्तापूर जिल्ह्यातील पहिले केंद्र

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 16, 2021 04:34 AM2021-03-16T04:34:26+5:302021-03-16T04:34:26+5:30

मेहकर : सलाम मुंबई फाउंडेशन आणि विकास सहयोग प्रतिष्ठान यांच्या माध्यमातून शिक्षण विभाग तंबाखूमुक्त शाळा अभियान राबवत आहे. भावी ...

The first center in Naigaon Dattapur district in the tobacco free school campaign | तंबाखूमुक्त शाळा अभियानात नायगाव दत्तापूर जिल्ह्यातील पहिले केंद्र

तंबाखूमुक्त शाळा अभियानात नायगाव दत्तापूर जिल्ह्यातील पहिले केंद्र

Next

मेहकर : सलाम मुंबई फाउंडेशन आणि विकास सहयोग प्रतिष्ठान यांच्या माध्यमातून शिक्षण विभाग तंबाखूमुक्त शाळा अभियान राबवत आहे. भावी पिढी तंबाखूमुक्त राहावी, व्यसनांच्या आहारी जाऊ नये, यासाठी शिक्षण विभागाने शाळांना तंबाखूमुक्त करण्याचे निर्देशित केले आहे. नायगाव दत्तापूर केंद्रातील १४ पैकी १४ शाळांनी टोबॅको फ्री स्कूल ॲपवर नोंदणी करून नऊ निकष पूर्ण केले आहेत. त्यामुळे तंबाखूमुक्त शाळा अभियानात नायगाव दत्तापूर केंद्राने जिल्ह्यातून बाजी मारली आहे.

शाळेत तंबाखूमुक्त उपक्रम राबविणे, जनजागृती विषयक घोषवाक्य लिहिणे, पोस्टर्स, रांगोळी उपक्रम, शैक्षणिक संस्थेचा संपूर्ण परिसर तंबाखूमुक्त घोषित करणे, शालेय परिसरापासून १०० यार्ड क्षेत्र चिन्हांकित करणे, यासाठी शिक्षण विभागाच्या वतीने जिल्ह्यातील सर्व शाळा तंबाखूमुक्त करण्याचे निर्देशित करण्यात आले आहे.

तंबाखूमुक्त शाळा उपक्रमासाठी गटविकास अधिकारी आशिष पवार, सहायक गटविकास अधिकारी गजानन पाटोळे, गट शिक्षणाधिकारी मधुकर वानखेडे, शि. वि. अधिकारी प्रादे, राजपूत यांच्या मार्गदर्शनात नायगाव दत्तापूर केंद्राचे केंद्रप्रमुख संजय लामधाडे यांनी केंद्रातील सर्व मुख्याध्यापक, सहा अध्यापक, पालक, ग्रामस्थांच्या सहकार्यातून केंद्रातील शंभर टक्के शाळा तंबाखूमुक्त केल्या आहेत. त्यामुळे नायगाव दत्तापूर केंद्राला तंबाखूमुक्त शाळा अभियानात पहिला येण्याचा बहुमान प्राप्त झाला आहे. या उपक्रमासाठी तंबाखूमुक्त जिल्हा समन्वयक संजय ठानगे, विकास सहयोग प्रतिष्ठानचे संदीप धोटे, राहुल खडसे तथा केंद्रांतर्गत सर्व मुख्याध्यापक शिक्षकांचे सहकार्य लाभले.

उपक्रमाच्या यशस्वीतेसाठी केंद्र प्रमुख संजय लामधाडे, अनिल धोंडगे, राजू निकम, गोपाल चांदणे, संजय वारकरी, राजू रहाटे, भगवान अवचार, संतोष भजने, तेजराव निकस, हिम्मतराव काळे, मनीषा भराड, शे. इरफान, रामेश्वर लोखंडे, सुधाकर भगत, परशराम काळे, रामदास मगर, भागवत भाकडे, विजय गवई तथा तज्ज्ञ मार्गदर्शक गजानन दाभाडे यांनी परिश्रम घेतले.

वरिष्ठांच्या मार्गदर्शनात तथा आदेशानुसार नायगाव दत्तापूर केंद्रात मुख्याध्यापक, स. अध्यापक तथा तज्ज्ञ मार्गदर्शक गजानन दाभाडे या सर्वांच्या सहकार्यातून केंद्रातील सर्व शाळा शंभर टक्के तंबाखूमुक्त झाल्या. सर्व निकषांची यापुढेही काटेकोर अंमलबजावणी करण्यात येईल.

संजय लामधाडे, केंद्रप्रमुख, नायगाव दत्तापूर.

Web Title: The first center in Naigaon Dattapur district in the tobacco free school campaign

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.