'कॉमन मॅन'चा विदर्भातील पहिला पुतळा बुलडाण्यात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 28, 2019 02:08 PM2019-07-28T14:08:04+5:302019-07-28T14:18:46+5:30

या ‘कॉमन मॅन’ च्या पूणाकृती पुतळ्याचे शुक्रवारी भारत विद्यालय परिसरात अनावर करण्यात आले.

 The first 'Common Man' statue in Vidarbha installed in Buldhana | 'कॉमन मॅन'चा विदर्भातील पहिला पुतळा बुलडाण्यात

'कॉमन मॅन'चा विदर्भातील पहिला पुतळा बुलडाण्यात

googlenewsNext
ठळक मुद्देसंस्थेचे अध्यक्ष आगाशे यांच्या संकल्पनेतून या पुतळ्याची उभारणी करण्यात आली.संपूर्ण विदर्भात कॉमन मॅनचा हा पहिलाच पूणार्कृती पुतळा असल्याची माहिती जाणकारांनी याप्रसंगी दिली.


बुलडाणा: सर्वसामान्य व्यक्तींच्या आशा-आकांक्षाचे प्रतिक असणाऱ्या, जगविख्यात व्यंगचित्रकार आर. के. लक्ष्मण यांच्या कुंचल्यातून साकारलेली व्यक्तीरेखा म्हणजे ‘कॉमन मॅन’. या ‘कॉमन मॅन’ च्या पूणाकृती पुतळ्याचे शुक्रवारी भारत विद्यालय परिसरात अनावर करण्यात आले. यावेळी संस्थेचे अध्यक्ष हर्षवर्धन आगाशे, युथ लिग रिक्रिएशन सेंटरचे पदाधिकारी सखाराम जतकर, डॉ. सीमा आगाशे, बीजीएसचे पदाधिकारी राजेश देशलरहा यांची प्रमुख उपस्थिती होती.
संस्थेचे अध्यक्ष आगाशे यांच्या संकल्पनेतून या पुतळ्याची उभारणी करण्यात आली. ‘कॉमन मॅन’ चा पुतळा हा विद्यार्थ्यांना सदैव सर्वसामान्यांच्या बाजूने उभी राहण्याची प्रेरणा देत राहील, असा आगाशे यांनी यावेळी व्यक्त केला. राजेश देशलहरा यांनी भारत विद्यालय परिसरातील प्रेरणादायी राहिलेल्या त्यांच्या बालपणीच्या आठवणी सांगून भारत विद्यालय करीत असलेल्या विविध सामाजिक कायार्चा गौरव केला. शाळेचे उपमुख्याध्यापक राम पालवे यांनी शाळेच्या उभारणीमध्ये रमेश कोर्डे यांनी दिलेल्या योगदानाविषयी सविस्तर माहिती विद्यार्थ्यांना दिली.
आर. के. लक्ष्मण यांच्या कार्यकर्तृत्वावर व ‘कॉमन मॅन’च्या या प्रतिकृतीवर नरेंद्र लांजेवार यांनी विशेष प्रकाश टाकला. तसेच सदर पुतळा येणाºया काळात शाळेचे मुख्य आकर्षण ठरणार असल्याच्या भावनाही त्यांनी व्यक्त केल्या. कार्यक्रमाचे साजेशे सूत्रसंचालन ग्रंथपाल नरेंद्र लांजेवार यांनी तर आभार प्रदर्शन उपमुख्याध्यापक राम पालवे यांनी केले. संपूर्ण विदर्भात कॉमन मॅनचा हा पहिलाच पूणार्कृती पुतळा असल्याची माहिती जाणकारांनी याप्रसंगी दिली. कॉमन मॅन च्या या पुतळा अनावरण प्रसंगी संस्थेचे सर्व शिक्षक, कर्मचारीवृंद तथा शहरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.  

Web Title:  The first 'Common Man' statue in Vidarbha installed in Buldhana

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.