कोरोनाच्या पहिल्या मृत्यूमुळे पश्चिम वऱ्हाड हादरला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 31, 2020 04:33 AM2020-12-31T04:33:05+5:302020-12-31T04:33:05+5:30

कोरोनामुळे अर्थकारण विस्कळीत झाले. जिल्हा वार्षिक योजनेला लगाम लागून प्राप्त निधी हा आरोग्यावर खर्च करण्याचा निर्णय झाला. आज जिल्ह्यात ...

The first death of Corona shook the West Warhad | कोरोनाच्या पहिल्या मृत्यूमुळे पश्चिम वऱ्हाड हादरला

कोरोनाच्या पहिल्या मृत्यूमुळे पश्चिम वऱ्हाड हादरला

Next

कोरोनामुळे अर्थकारण विस्कळीत झाले. जिल्हा वार्षिक योजनेला लगाम लागून प्राप्त निधी हा आरोग्यावर खर्च करण्याचा निर्णय झाला.

आज जिल्ह्यात कोरोना संदर्भाने पायाभूत सुविधा उपलब्ध झाल्या आहेत. मिशन बिगीन अगेन अंतर्गत जनजीवन सुरळीत सुरू असले तरी अद्यापही कोरोनाची धास्ती आहे. आरोग्य विभागच्या दृष्टीने ही एक प्रकारे इष्टापत्ती ठरली असली तरी कोरोना विरोधातील लढ्यात आजपर्यंत १६० बाधितांचा मृत्यू झाला आहे. हे भरून न निघणारे नुकसान आहे.

माणुसकी हरता हरता जिंकली

मृत पावलेल्या सख्ख्या भावंडांना, आई वडिलांना अग्नी देण्यासाठी कोणी धजावत नव्हते. तर एकाच स्मशान भूमीत अंत्यसंस्कार का? या मुद्द्यावरूनही आरोग्य, पोलीस प्रशासन विरुद्ध समाज असा संघर्ष झाला. दुसरीकडे लॉकडाऊनमध्ये अडकलेल्यांना रात्री बेरात्री फिरून अनेकांनी जेवण दिले. त्यातून सामुदायिक माणुसकीचा एक प्रत्यय आला आणि तेथूनच कोरोना विरोधातील लढ्याला बळ मिळाले.

Web Title: The first death of Corona shook the West Warhad

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.