जिल्हा परिषद शाळेची विद्यार्थीनी झाली प्रथम महिला पीएसआय
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 29, 2018 02:34 PM2018-06-29T14:34:19+5:302018-06-29T14:35:32+5:30
खामगाव : खामगाव पंचायत समिती अंतर्गत जिल्हा परिषद मराठी उच्च प्राथमिक शाळा टेंभुर्णा शाळेची व वर्गशिक्षिका वनश्री उर्मिलाताई ठाकरे यांची विद्यार्थीनी आरती गवई ही एमपीएससी मार्फत प्रथम महिला पीएसआय झाली आहे
खामगाव : खामगाव पंचायत समिती अंतर्गत जिल्हा परिषद मराठी उच्च प्राथमिक शाळा टेंभुर्णा शाळेची व वर्गशिक्षिका वनश्री उर्मिलाताई ठाकरे यांची विद्यार्थीनी आरती गवई ही एमपीएससी मार्फत प्रथम महिला पीएसआय झाली आहे. यानिमित्ताने शाळेमध्ये जि.प. सदस्या जयश्रीताई टिकार, केंद्रप्रमुख वनश्री उर्मिलाताई ठाकरे, सामाजिक कार्यकर्ता विनोद टिकार, एम.आर. सोळंके, अरविंद शिंगाडे, मु.अ. रमेश चव्हाण, शिक्षक वर्ग व गावकऱ्यांच्या उपस्थितीत भव्य नागरी सत्कार समारंभ संपन्न झाला. आरती गवई हिच्या यशोदीप कर्तृत्वामुळे शिक्षकांच्या शैक्षणिक कार्याची अधिक उंची वाढली आहे.
टेंभुर्णा हे अतिशय छोटेसे खेडे आरती गवई यांची परिस्थिती अतिशय बिकट व कठीण, अठरा विश्व दारिद्रय आरती शाळेमध्ये अतिशय नम्र, हुशार, स्वाभिमानी व अभ्यासु वृत्तीची होती. या विद्यार्थीनीने शिक्षण घेताना खुप कष्ट, मेहनत आणि जिद्दीने लढा देऊन तिने तिच्या जीवनातले सर्वात मोठे यश प्राप्त केले आहे. या तिच्या यशाचे कौतुक करावे तेवढे कमीच आहे. कार्यक्रमाचे संचालन गचके यांनी तर आभार प्रदर्शन संगीता खरात यांनी केले. (प्रतिनिधी)