ग्रामस्वच्छता अभियानात पांगरखेड विभागात प्रथम
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 7, 2017 03:35 AM2017-08-07T03:35:19+5:302017-08-07T03:35:22+5:30
अजिसपूर गावाने पटकावला तिसरा क्रमांक
लोकमत न्यूज नेटवर्क
बुलडाणा/डोणगाव: सन २०१६-१७ साठी शासनाच्या वतीने राबविण्यात आलेल्या संत गाडगेबाबा ग्रामस्वच्छता अभियानामध्ये बुलडाणा जिल्हा परिषदेतील मेहकर तालुका अंतर्गत
असलेल्या ग्रामपंचायत पांगरखेडने अमरावती विभागात प्रथम क्रमांक पटकावला असून, बुलडाणा तालुक्यातील ग्रामपंचायत अजिसपूरनेही तृतीय क्रमांकाचा पुरस्कार पटकावला
आहे.
संत गाडगेबाबा स्वच्छता अभियानामध्ये स्वच्छता, आरोग्य, सांडपाणी व्यवस्था, स्वच्छ पेयजल, पायाभूत सुविधा यावर गुण दिले जातात. या अगोदर ग्रामस्वच्छता अभियानात
पांगरखेड हे गाव मेहकर तालुक्यातून प्रथम आलेले आहे. तर याच गावाची अमरावती विभागीय स्पर्धेत निवड झाली. या गावाने अन्य जिल्ह्यातील गावांना मागे टाकत अमरावती
विभागातून संत गाडगेबाबा स्वच्छता अभियानात प्रथम क्रमांक पटकाविला आहे. या गावाला दहा लाखांचा प्रथम पुरस्कार जाहीर झाला आहे तर बुलडाणा जिल्ह्यातील अजिसपूरला
तृतीय क्रमांक प्राप्त झाला असून, सदर गावाला सहा लाखाचा पुरस्कार जाहीर झाला आहे. पांगरखेड ग्रामपंचायतने याअगोदर संपूर्ण घरकर भरणाºयासाठी मोफत दळण योजना तसेच
सरपंच अंजली सुर्वे यांनी गावाला स्वखर्चाने स्वत:च्या विहिरीवरून पाणी उपलब्ध करून दिले आहे. तर शौचालय बांधकामासाठी प्रोत्साहन योजना, भूमिगत गटारे, महिलांसाठी ह
क्काचे माहेर घर, महिलांना स्वयंपूर्ण बनविण्यासाठी मोफत शिलाई मशीन प्रशिक्षण अशा विविध योजना ग्रामपंचायतने गावात राबवून स्वच्छतेचा मूलमंत्र दिला असल्याने सदर
गावाची पाहणी विभागीय पथकाकडून २६ व २९ जूनला मूल्यमापन समितीने तपासणी केली. त्यामध्ये पांगरखेड हे विभागीय स्तरावर प्रथम आले असून, सदर विभागीय पुरस्कार
प्रमाणपत्र घेण्यासाठी सरपंच व सचिव यांनी १५ आॅगस्ट स्वातंत्र्यदिनी विभागीय आयुक्त कार्यालय, अमरावती येथे पालकमंत्री यांच्या हस्ते पुरस्कार प्रमाणपत्र घेण्यासाठी उपस्थित
राहण्याचे पत्र ४ आॅगस्ट रोजी विभागीय आयुक्त अमरावती यांनी मुख्य कार्यकारी अधिकारी बुलडाणा यांना दिले आहे.