पहिल्या टप्प्यात २० ग्रा.पं.च्या सरपंच, उपसरपंचांची निवड !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 11, 2021 04:36 AM2021-02-11T04:36:33+5:302021-02-11T04:36:33+5:30
चिखली : चिखली तालुक्यातील ६० ग्रामपंचायतींच्या सरपंच व उपसरपंच निवडीअंतर्गत मंगळवारी, ९ फेब्रुवारी रोजी पहिल्या टप्प्यात २० गावांच्या सरपंच ...
चिखली : चिखली तालुक्यातील ६० ग्रामपंचायतींच्या सरपंच व उपसरपंच निवडीअंतर्गत मंगळवारी, ९ फेब्रुवारी रोजी पहिल्या टप्प्यात २० गावांच्या सरपंच व उपसरपंचांची निवड करण्यात आली आहे. यामध्ये तालुक्यातील वैरागड व दिवठाणा या गावच्या सरपंचपदाच्या आरक्षणानुसार आरक्षित प्रवर्गातील ग्रामपंचायत सदस्य नसल्याने दोन्ही गावांचे सरपंचपद रिक्त राहिले आहे.
तालुक्यातील ६० ग्रामपंचायतींची सार्वत्रिक निवडणुक पार पडल्यानंतर या ग्रामपंचायतींच्या सरपंच व उपसरपंच पदासाठी टप्प्या-टप्प्याने निवडणूक घेण्यात येत आहे. यातील पहिल्या टप्प्यात ९ फेब्रुवारी रोजी २० ग्रामपंचायतींच्या सरपंच व उपसरपंचांची निवडणूक पार पडली. यामध्ये शेलसूर सरपंचपदी विजय सखाराम धंदर, उपसरपंचपदी सुनील भगवान धुंदळे, साकेगाव सरपंचपदी उर्मिला विरोधभाई पवार, उपसरपंचपदी देविदास नामदेव लोखंडे, ब्रम्हपुरी सरपंचपदी प्रभाकर किसन भुतेकर, उपसरपंचपदी लता सतीष वानखेडे, किन्होळा सरपंचपदी अर्चना वसंता जाधव, उपसरपंचपदी कल्पना अनिलसिंग राजपूत, हरणी सरपंचपदी मिताली संतोष साळवे, उपसरपंचपदी संगीता शिवलाल चव्हाण, उत्रादा सरपंचपदी सिंधू रमेश इंगळे, उपसरपंचपदी नवलसिंग बिदेसिंग इंगळे, धोत्रा भनगोजी सरपंचपदी गुलाबसिंग रामसिंग सोनारे, उपसरपंचपदी प्रसाद संभाजी काळे, टाकरखेड मु. सरपंचपदी लक्ष्मी भागवत खेन्ते, उपसरपंचपदी तेजराव लक्ष्मण गायकवाड, एकलारा सरपंचपपदी छाया गजानन आंभोरे, उपसरपंचपदी मालता विजय लंके, सोमठाणा सरपंचपदी गीता विजय परिहार, उपसरपंचपदी विठ्ठल बापुराव झगरे, खोर सरपंचपदी पूनम दीपक हाके, उपसरपंचपदी राहुल सिद्धार्थ सावळे, धोत्रा नाईक सरपंचपदी दीपाली भीमसेन सरसंडे, उपसरपंचपदी सुमित्रा राजू शेळके, माळशेंबा सरपंचपदी सुमन फकीरबा खोसरे, उपसरपंचपदी वसंत गणपत जाधव, अमडापूर सरपंचपदी वैशाली संजयकुमार गवई, उपसरपंचपदी अजीज खा बाबा खा, तोरणवाडा सरपंचपदी कविता संघपाल गवई, उपसरपंचपदी शीला राजेंद्र कुळसुंदर, ईसोली सरपंचपदी सुनील अर्जुन शेळके, उपसरपंचपदी प्रकाश उद्धव लाधे, शेलोडी सरपंचपदी समाधान चिधाजी रिठे, उपसरपंचपदी चंद्रकला पांडुरंग नेमाने, करवंड सरपंचपदी सपना काशिनाथ मोरे, उपसरपंचपदी ज्योती उत्तम राठोड यांची निवड झाली आहे. तर सरपंचपदाच्या आरक्षणानुसार आरक्षित प्रवर्गातील ग्रा.पं. सदस्य नसल्याने सरपंचपद रिक्त राहिलेल्या वैरागडच्या उपसरपंचपदी गजानन वसंता बनकर आणि दिवठाणाच्या उपसरपंचपदी अनंता मुक्त्यारसिंग मोरे यांची निवड झाली आहे.