पहिल्याच पावसात पुल गेला वाहून
By admin | Published: June 16, 2017 01:31 PM2017-06-16T13:31:10+5:302017-06-16T13:31:10+5:30
दोन लक्ष रुपये खर्चुन बांधण्यातआलेल्या पुलाचे निकृष्ट बांधकामाचे पहिल्याच पावसात पितळ उघडे पडले.
धामणगांवबढे: अवघे एक महिन्यापूर्वी दोन लक्ष रुपये खर्चुन बांधण्यात
आलेल्या पुलाचे निकृष्ट बांधकामाचे पहिल्याच पावसात पितळ उघडे पडले. १३
जूनच्या रात्री झालेल्या मुसळधार पावसात पुलालामध्ये खिंडार पडले असून
दोन्ही बाजुंनी पुल वाहून गेला.
जि.प.फंडातून या नदीवर पुलाचे बांधकाम पंचायत समिती मोताळा संबंधीत
विभागाच्या देखरेखखाली ग्रामपंचायतच्यावतीने करण्यात आले. कुरेशी
कब्रस्थानमध्ये जाण्यासाठी हा पुल नदीवर बांधण्यात आला होता. मोताळा
पंचायत समितीच्या संबंधित विभागाशी तसेच ग्रामपंचायतच्या कारभाराची
लक्तरे यामुळे वेशिवर टांगली तर शासनाच्या पैशाचा अपव्यय समोर आला.
संबंधित कामाच्या निकृष्ठ दर्जाबाबत ग्रामपंचायत सदस्य गजानन घोंगडे
यांनी १८ एप्रिल २०१७ रोजी गटविकास अधिकारी मोताळा व कार्यकारी अधिकारी
बुलडाणा यांचेकडे तक्रार केली होती. पहिल्याच पावसात पुलास भगदाड पडले.
या प्रकरणाच्या चौकशीची मागणी ग्रामपंचायत सदस्य गजानन घोंगडेसह
नागरिकांनी प्रशासनाकडे केली आहे.