युवा महोत्सात अनुराधा अभियांत्रिकेचे विद्यार्थी प्रथम
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 1, 2017 08:37 PM2017-10-01T20:37:48+5:302017-10-01T20:38:01+5:30
चिखली : संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाच्या विद्यार्थी विकास विभागाव्दारे अमरावती येथे आयोजित विद्यापीठस्तरीय युवा महोत्सवामध्ये स्थानिक अनुराधा अभियांत्रिकी महाविद्यालयातील चमुने सक्रीय सहभाग नोंदवित क्वीज (प्रश्नमंजुषा) या प्रकारात प्रथम क्रमांक मिळविला आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
चिखली : संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाच्या विद्यार्थी विकास विभागाव्दारे अमरावती येथे आयोजित विद्यापीठस्तरीय युवा महोत्सवामध्ये स्थानिक अनुराधा अभियांत्रिकी महाविद्यालयातील चमुने सक्रीय सहभाग नोंदवित क्वीज (प्रश्नमंजुषा) या प्रकारात प्रथम क्रमांक मिळविला आहे.
अमरावती येथे २७ ते २९ सप्टेंबर दरम्यान पार पडलेल्या या युवा महोत्सवामध्ये अनुराधा अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या गौरव शिवाजीराव बावीस्कर, गौरव विजय भाकरे, अदनान इम्रानोद्दिन काझी यांच्या चमुने हे यशसंपादीत केले आहे़ अमरावती विद्यापिठातील १९६ महाविद्यालयाच्या चमुने प्रश्नमंजुषा या स्पर्धेत सहभाग नोंदविला होता़ या स्पर्धेची पूर्व लेखी चाचणी २७ सप्टेबर रोजी घेण्यात आली होती. यामध्ये अव्वल चार महाविद्यालयांची अंतिम फेरीसाठी निवड करण्यात आली होती. २८ सप्टेबर रोजी आयोजित अंतिम फेरीमध्ये अनुराधा अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या चमुने प्रथम क्रमांक प्राप्त केला़ स्पर्धेचे समन्वयक म्हणून प्रा़ देवेंद्र प्रभुणे यांनी काम पाहिले. दरम्यान महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी आॅन स्पॉट पेंटिंग, क्ले मॉडलींग, पोस्टर मेकिंग, कोलाज, वक्तृृत्व, वादविवाद आदी कलाप्रकारात सक्रीय सहभाग नोंदवित युवा महोत्सवात आपल्या कलागुणांचे सादरीकरण केले़ विजेत्या चमुतील विद्यार्थ्यांचे महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.अरूण नन्हई यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. यावेळी प्रा़ डॉ.राजेंद्र कोकाटे, प्रा.गुरुदासाणी, प्रा.मापारी यांची उपस्थिती होती़ विद्यार्थ्यांना प्रा.डॉ.मंगेश कडु यांचे मार्गदर्शन लाभले असून चमु व्यवस्थापक म्हणून प्रा.विंचूरकर यांनी काम पाहिले़ या यशाबद्दल संस्थेचे अध्यक्ष तात्यासाहेब बोंद्रे, सचिव आ.राहुल बोंद्रे, उपाध्यक्ष डॉ.व्ही.आर.यादव, विश्वस्त सिध्देश्वर वानेरे यांनी समाधान व्यक्त केले आहे.