जिल्ह्यात प्रथमच कोरोना संक्रमणाचा आकडा शून्यावर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 14, 2021 04:40 AM2021-08-14T04:40:06+5:302021-08-14T04:40:06+5:30
मात्र अद्यापही १४७४ संदिग्धांच्या अहवालाची प्रतीक्षा आहे. परंतु कोरोना संक्रमण जिल्ह्यात नगण्य झाले, ही मोठी दिलासादायक बाब म्हणावी लागेल. ...
मात्र अद्यापही १४७४ संदिग्धांच्या अहवालाची प्रतीक्षा आहे. परंतु कोरोना संक्रमण जिल्ह्यात नगण्य झाले, ही मोठी दिलासादायक बाब म्हणावी लागेल. शुक्रवारी प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठविलेल्या अहवालांपैकी २ हजार ५२७ जणांचे अहवाल प्राप्त झाले. त्यापैकी एकही जण कोरोना बाधित आढळून आला नाही. दुसरीकडे आठ जणांनी कोरोनावर मात केल्यामुळे त्यांना रुग्णालयातून सुटी देण्यात आली आहे. आजपर्यंत तपासणी करण्यात आलेल्या संदिग्धांपैकी ६ लाख ६३ हजार १८८ जणांचे अहवाल निगेटिव्ह आले आहे तर, ८६ हजार ६२० कोरोना बाधितांनी आतापर्यंत कोरोनावर मात केली आहे. जिल्ह्यातील एकूण कोरोना बाधितांची संख्या ८७ हजार ३५१ झाली असून, त्यापैकी ६७ सक्रिय रुग्णांवर उपचार करण्यात येत आहेत. आजपर्यंत जिल्ह्यात ६७२ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला असल्याची माहिती निवासी उपजिल्हाधिकारी दिनेश गीते यांनी दिली.