तंदुरुस्ती व तंत्र खेळात यशासाठी महत्त्वाचे- दीपशिखा हिवाळे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 29, 2019 07:56 PM2019-06-29T19:56:13+5:302019-06-29T19:58:27+5:30
तंदुरुस्ती व तंत्र खेळात यशासाठी महत्त्वाचे- दीपशिखा हिवाळे
Next
href='http://www.lokmat.com/topics/football/'>फुटबॉलमध्येच करणार करियरलोकमत न्यूज नेटवर्कबुलढाणा: जळगाव येथे नुकत्याच झालेल्या राज्यस्तरीय फुटबॉल स्पर्धे बुलडाणा जिल्ह्याच्या संघाने अंतिम सामन्यापर्र्यंत धडक मारली. जळगाव येथे वेस्टन फुटबॉल असोसिएशन, मुंबई तर्फे आयोजित राज्यस्तरीय स्पर्धेत बुलडाण्याच्या दीपसीका हिवाळे हीने दमदार कामगिरी केली. प्रामुख्याने मिडफिल्डर असलेल्या दीपसीकाची शारीरिक तंदुरुस्ती व खेळाचे तंत्र वाखाणण्या जोगे आहे. त्यानुषंगाने तिच्याशी साधलेला हा संवाद... स्पर्धेत कामगिरी कशी झाली?नॉक आऊट पद्धतीने जळगाव येथे या स्पर्धा घेण्यात आल्या. सातारा, वाशिम, नागपूर आणि गोंदिया संघाना आम्ही दमदार कामगिरी करून हरवले. अंतिम सामन्यात मात्र नशिबाची साथ आम्हाला मिळाली नाही. अंतिम सामन्यात आम्ही जोर लावला. शेवटी पेनल्टी शुट आऊटवर हा सामना पुण्याने जिंकला.बुलडाण्याच्या संघाकडून कोणाची कामगिरी दमदार राहली.?निकीता जाधव, एश्वर्या उबरहंडे , पोर्णिमा जाधव यांच्या समवते आपले ट्युनिंग चांगले आहेल. आमच्या मुव्हही स्पर्धेत उत्तम ठरल्या आहेत. त्याच्या चोरावच आम्ही अंतिम सामन्यापर्र्यंत धडक मारली होती. नागपूरच्या बलाढ्य संघालाही आम्ही उपांत्यपूर्व सामन्यात १-० ने मात दिली. आमचा आपसी समन्वय चांगला आहे. पुढील उदिष्ट काय?सध्या मुंबईच्या एफसी फुटबॉल क्लबकडून खेळत आहे. भारताकडून आपणास फुटबॉल खेळायचा आहे. त्यासाठी कसूनसराव करत आहे. हे उदिष्ट नक्की साध्य होईल. फुटबॉलकडे कसे वळाली?वडील दिलीप हिवाळे हे कब्बडी आणि फुटबॉल खेळायचे. प्रसंगी लहानपणी त्यांच्या समवते बºयाचदा मैदानावर जाण्याचा योग यायचा. त्यातून खेळाची आवड निर्माण झाली. फुटबॉल खेळ भावला आणि आपसूकच त्याकडे वळाले. बुलडाण्यात फुटबॉल स्थिरावतोय?गेल्या एक दशकापासून बुलडाण्याच्या मुलांच्या संघाचा राज्यात दबदबा वाढवत आहे. प्रफुल्ल मोहरील सर, एन. आर. वानखेडे, सुनील जोशी, मुकेश बाफणा, एस. एस. ठाकरे, रमिझ चौधरी यांचे मार्गदर्शन आपणास उपयुक्त ठरले आहे. त्यांच्या सर्वंकष प्रयत्नातून बुलडाण्यात महिला फुटबॉलचा संघ आकारास येत आहे.आय लीग स्पर्धाही बुलडाण्याची पाच मुलींनी खेळली आहे. एफसी क्लबकडूनही ११ मुली खेळल्या आहेत. येथे महिला फुटबॉल स्थिरावतेय. आंतरराष्ट्रीय स्पर्धेत भारताचे प्रतिनिधित्व करण्याची इच्छा आहे आणि ती निश्चितच पूर्ण होईल. त्या दृष्टीने सातत्यपूर्ण सरावाला प्राधान्य देत आहे. लहानपणी बुलडाण्याच्या पुजा मोरे हिचा खेळ मी सातत्याने पाहिला आहे. तिने केलेले मार्गदर्शन वेळोवेळी उपयोगी ठरले आहे. शेख सिरीन हीपण बुलडाण्याची फुटबॉल पटू होती. त्यांच्या विषयी ऐकत मोठी झाले. देशात या खेळाच्या माध्यमातून जिल्ह्याचे नाव पोहोचवायचे आहे.- दीपसीका हिवाळे