गव्हाच्या अफरातफरप्रकरणी पाच जणांविरुद्ध गुन्हा!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 29, 2018 02:14 AM2018-03-29T02:14:13+5:302018-03-29T02:14:13+5:30
खामगाव : येथील रेशन गहू अफरातफरप्रकरणी पोलिसांनी पुरवठा कंत्राटदारासह गोदाम व्यवस्थापकाविरोधात गुन्हा दाखल केला. बुधवारी पहाटे या प्रकारामुळे अवैध रेशन माफियासोबतच पुरवठा विभागातील अधिकाºयांचे धाबे दणाणले आहे. यामध्ये तीन आरोपी अटकेत असून, पुरवठा कंत्राटदार आणि गोदाम व्यवस्थापक फरार आहेत
लोकमत न्यूज नेटवर्क
खामगाव : येथील रेशन गहू अफरातफरप्रकरणी पोलिसांनी पुरवठा कंत्राटदारासह गोदाम व्यवस्थापकाविरोधात गुन्हा दाखल केला. बुधवारी पहाटे या प्रकारामुळे अवैध रेशन माफियासोबतच पुरवठा विभागातील अधिका-यांचे धाबे दणाणले आहे. यामध्ये तीन आरोपी अटकेत असून, पुरवठा कंत्राटदार आणि गोदाम व्यवस्थापक फरार आहेत.
रेशनच्या गव्हाची वाहतूक करणाºया ट्रकमधून ७ कट्टे उतरवून दुसºया वाहनात टाकल्या जात असल्याचा प्रकार मंगळवारी खामगावात उघडकीस आला. याप्रकरणी शिवाजीनगर पोलिसांनी तिघांसह दोन वाहनांना चिखली बायपासवरून ताब्यात घेतले होते. त्यानंतर पोलिसांनी महसूल प्रशासनाला पत्र देत, पकडण्यात आलेला धान्यसाठा नेमका कुणाचा? यासंदर्भात विचारणा करण्यात आली. रात्री उशिरा तहसीलचे निरीक्षण अधिकारी गजानन बाळकृष्ण चव्हाण यांच्या तक्रारीवरून शिवाजी नगर पोलिसांनी ट्रकचालक सय्यद इरफान सय्यद आलम (३८, रा.
डोंगरगाव ता. कारंजा जि. वाशिम), शेख नदीम शेख नईम (२२) आणि हसन खान हुसेन खान ( ३०, दोघेही रा. बर्डे प्लॉट खामगाव) यांच्यासह वाहतूक कंत्राटदार राजू गुप्ता आणि गोदाम व्यवस्थापक जी. एस. देशपांडे यांच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे.
करारनाम्यातील तरतुदीनुसार कंत्राटदारावर कारवाई!
सार्वजनिक वितरण व्यवस्थेंतर्गत धान्य उपलब्धतेच्या हमीकरिता निश्चित केलेल्या सुधारित वितरण पद्धतीनुसार अन्नधान्य व इतर जीवनावश्यक वस्तूंचे वाहन कंत्राटातील तरतुदीनुसार वाहतुकीदरम्यान वाहतूक कंत्राटदाराचे प्रतिनिधी, चालक, वाहक यांच्याकडून होणाºया कोणत्याही प्रकारच्या अफरातफर/ काळ्या बाजारास सर्वस्वी वाहतूक कंत्राटदारास जबाबदार धरण्यात येईल, अशी तरतूद आहे. त्या आधारे वाहतूक करणाºया कंत्राटदारास याप्रकरणी आरोपी करण्यात आले आहे. पोलीस तपासात असहकार्य आणि वाहतूक कंत्राटदाराशी हातमिळवणीच्या संशयावरून गोदाम व्यवस्थापक जी. एस. देशपांडे यांच्यावरही गुन्हा दाखल करण्यात आला आहे.