बसचालकाच्या खूनप्रकरणी पाच आरोपींना जन्मठेप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 10, 2019 03:01 PM2019-04-10T15:01:39+5:302019-04-10T15:01:43+5:30

मेहकर: जळगाव जिल्ह्यातील वरणगाव येथे ट्रॅक्टरला कट लागल्याच्या कारणावरून मेहकर आगाराच्या बसचालकाला बेदम मारहाण करून खून केल्याची घटना १२ जून २०११ मध्ये घडली होती. याप्रकरणी ९ एप्रिल रोजी भुसावळ येथील न्यायालयात पाच आरोपींना जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली आहे.

Five accused have been given life imprisonment for the murder of bus driver | बसचालकाच्या खूनप्रकरणी पाच आरोपींना जन्मठेप

बसचालकाच्या खूनप्रकरणी पाच आरोपींना जन्मठेप

googlenewsNext

लोकमत न्यूज नेटवर्क
मेहकर: जळगाव जिल्ह्यातील वरणगाव येथे ट्रॅक्टरला कट लागल्याच्या कारणावरून मेहकर आगाराच्या बसचालकाला बेदम मारहाण करून खून केल्याची घटना १२ जून २०११ मध्ये घडली होती. याप्रकरणी ९ एप्रिल रोजी भुसावळ येथील न्यायालयात पाच आरोपींना जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली आहे. भुसावळ येथील अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायाधीश प्रशांत सित्रे यांनी मंगळवारी हा निकाल दिला.
मेहकर आगाराची बस (क्रमांक एमएच-४०-एन-८७९२) ही जळगाव ते लोणार जात होती. या बसचा फुलगाव फाट्याजवळ भुईमुगाचा पाला घेऊन जाणाऱ्या ट्रॅक्टरला धक्का लागला, असा आरोप करून ट्रॅक्टरवरील समाधान भास्कर कोळी (रा. अंजनसोडा), प्रमोद इंगळे, सुरेश देवराम पाटील, संदीप ऊर्फ मनू रामा इंगळे (सर्व रा. ओझरखेड) व जयेश सारंगधर पंडित पाटील (रा. साकेगाव) यांनी एसटी बसला वरणगाव येथील देशमुख पेट्रोल पंपाजवळ ओव्हरटेक करून बस अडवली. यानंतर बसचालक प्रकाश नारायण मस्के (४०, रा. पर्तापूर, ता. मेहकर) यांना बेदम मारहाण केली. या प्रकरणी बसवाहक वैभव माणिकराव शिरसाट यांनी वरणगाव पोलीस स्टेशनला फिर्याद दिली. यावरून पाच जणांविरुद्ध विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला होता; मात्र उपचारादरम्यान बसचालक प्रकाश मस्के यांचा मृत्यू झाला. त्यामुळे वरणगाव पोलीस स्टेशनला खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला. यासंदर्भात नऊ साक्षीदार तपासण्यात आले, तर डॉ. पंकज सैदाणे यांनी शवविच्छेदन केले होते. आरोपींविरुद्ध साक्षीदार महत्त्वपूर्ण ठरले. त्यामुळे या पाचही आरोपींना मंगळवारी जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली आहे. (शहर प्रतिनिधी)

Web Title: Five accused have been given life imprisonment for the murder of bus driver

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.