बुलढाणा : वीज काेसळून पाच गुरे ठार, रब्बी पिकांचेही माेठ्या प्रमाणात नुकसान
By संदीप वानखेडे | Published: April 10, 2023 06:25 PM2023-04-10T18:25:01+5:302023-04-10T18:25:16+5:30
साेंगणीला आलेल्या रब्बी पिकांचेही माेठ्या प्रमाणात नुकसान झाले.
बुलढाणा - जिल्ह्यात रविवारी रात्री वादळासह अवकाळी पाऊस झाला. पावसादरम्यान वेगवेगळ्या ठिकाणी वीज काेसळून पाच गुरे ठार झाली. साेंगणीला आलेल्या रब्बी पिकांचेही माेठ्या प्रमाणात नुकसान झाले. त्यामुळे शेतकरी संकटात सापडले आहेत. मेहकर तालुक्यातील देउळगाव साकर्शा येथील तेजरात नहार यांच्या शेतातील गाेठ्यावर वीज काेसळली. यामध्ये दाेन बैल आणि एक म्हैस ठार झाली. बैलांची किंमत १० हजार तर म्हशीची किंमत ८० हजार रुपये आहे.
या घटनेत नहार यांचे ९० हजार रुपयांचे नुकसान झाले. मलकापूर तालुक्यातील दसरखेड शिवारात निना सुपडा महाजन यांच्या म्हशीच्या अंगावर वीज काेसळली. यामध्ये म्हशीचा जागीच मृत्यू झाला. त्यामुळे त्यांचे माेठ्या प्रमाणात नुकसान झाले. देऊळगाव राजा तालुक्यातील मेंडगाव शिवरात वीज काेसळून गाय ठार झाली. त्यामुळे हरिदास घुगे यांचे माेठ्या प्रमाणात नुकसान झाले.