सव्वा कोटींची पाणीपट्टी थकीत
By admin | Published: February 4, 2016 01:34 AM2016-02-04T01:34:07+5:302016-02-04T01:34:07+5:30
लाखनवाडा २१ गावे योजनेच्या वसुलीसाठी धावपळ, काही ठिकाणचा वीजपुरवठा खंडित
गिरीश राऊत / खामगाव: तालुक्यातील लाखनवाडा २१ गाव पाणीपुरवठा योजनेची तब्बल सव्वा कोटी रुपयांची पाणीपट्टी थकीत झाली आहे. यामुळे वीज देयकसुद्धा थकले असून, काही गावातील पाणीपुरवठासुद्धा बंद करण्यात आल्याची ओरड नागरिकांकडून केल्या जात आहे. वीज देयक भरण्यासाठी व देखभाल दुरुस्तीसाठी लागणार्या खर्चासाठी पाणीपुरवठा विभागाच्या अधिकार्यांनी धावपळ सुरू केली असून, रक्कम वसूल करण्यासाठी प्रयत्न सुरु झाले आहेत. तालुक्यातील ग्रामीण भागात लाखनवाडा प्रादेशिक पाणीपुरवठा योजना ही एकमेव मोठी पाणीपुरवठा योजना कार्यान्वित आहे. या योजनेंतर्गत तालुक्यातील २१ गावांमध्ये पाणीपुरवठा केला होता. मात्र, वसुलीअभावी या २१ गावांतील नागरिकांकडे २0१२ पासून डिसेंबर २0१५ अखेरपर्यंत १ कोटी २0 लाख ४६ हजार ९४६ रुपयांची पाणीपट्टी थकीत झाली आहे.