अंढेरा येथे पाच दिवस लाॅकडाऊन!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 24, 2021 04:32 AM2021-03-24T04:32:40+5:302021-03-24T04:32:40+5:30

अंढेरा : गावात काेराेना रुग्णांची संख्या वाढत असल्याने ग्रामपंचायत प्रशासनाने खबरदारी म्हणून व्यावसायिक व ग्रामस्थ ...

Five days lockdown in the dark! | अंढेरा येथे पाच दिवस लाॅकडाऊन!

अंढेरा येथे पाच दिवस लाॅकडाऊन!

Next

अंढेरा : गावात काेराेना रुग्णांची संख्या वाढत असल्याने ग्रामपंचायत प्रशासनाने खबरदारी म्हणून व्यावसायिक व ग्रामस्थ या सर्वांची २३ मार्च रोजी बैठक घेतली. यामध्ये २४ मार्च ते २८ मार्च दरम्यान पाच दिवस लाॅकडाऊन निश्चित करण्यात आले. त्यामध्ये दवाखाना व मेडिकल ही अत्यावश्यक सेवा वगळता इतर सर्व प्रतिष्ठाने सकाळी ११ ते दुपारी ३ याच वेळेत उघडी ठेवण्याची मुभा देण्यात आली आहेत. या व्यतिरिक्त प्रतिष्ठाने उघडी असल्याच दंडात्मक कारवाई करण्यात येणार असून दोन हजार रुपयांचा दंड आकारण्यात येणार आहे.

सर्वाना विश्वासात घेऊन गावातील कोरोना रुग्णांची वाढत असलेली रुग्णसंख्या, कोरोनाची साखळी तोडण्यासाठी काही कडक निर्बंध घालण्यात आले आहेत. नागरिकांनी आपली कोरोना चाचणी करुन घेण्याचे आवाहन वैद्यकीय अधिकारी डॉ. शारदा मांटे यांनी केले आहे. तसेच नियमित मास्कचा वापर करणे अन्यथा ग्रामपंचायत प्रशानाच्या वतीने दोनशे रुपयांचा दंड आकारण्याचा निर्णय घेण्यात आला.तसेच अंढेरा पोलिसांनीसुध्दा विनाकारण बाहेर फिरणारे तसेच विना मास्क असणाऱ्यांवर कडक कार्यवाही करावी असे आवाहन स्थानिक ग्रामपंचायत च्या वतीने करण्यात आले आहे.

यावेळी वैद्यकीय अधिकारी डॉ. शारदा मांटे, अंढेरा पोलीस स्टेशनचे दुय्यम ठाणेदार मोहन पाटील, गणेश आंबिलकर, ग्रामविकास अधिकारी पी. बी. खेडेकर, पोलीस पाटील संतुबा सानप, प्रा. दिलीप सानप, बीट जमादार निवृत्ती पोफळे, गजानन वाघ, ग्रामपंचायत सदस्य सतीश विनकर, बद्री सानप, पंढरी तेजनकर, रामा बनसोडे, किरण पालवे, मधुकर चव्हाण, सतीश देशमुख, गजानन कुटे, प्रमोद सानप, वामन सानप, भारत तेजनकर व व्यवसायिक व गावकरी उपस्थित होते.

Web Title: Five days lockdown in the dark!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.