जिल्ह्यात कोरोनाने पाच मृत्यू, ६३४ पॉझिटिव्ह

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 6, 2021 04:33 AM2021-04-06T04:33:58+5:302021-04-06T04:33:58+5:30

प्राप्त पॉझिटिव्ह अहवालामध्ये प्रयोगशाळेतील ५०० व रॅपिड टेस्टमधील १३४ अहवालांचा समावेश आहे. निगेटिव्ह अहवालामध्ये प्रयोगशाळेतून ५५५, तर रॅपिड टेस्टमधील ...

Five deaths due to corona in the district, 634 positive | जिल्ह्यात कोरोनाने पाच मृत्यू, ६३४ पॉझिटिव्ह

जिल्ह्यात कोरोनाने पाच मृत्यू, ६३४ पॉझिटिव्ह

Next

प्राप्त पॉझिटिव्ह अहवालामध्ये प्रयोगशाळेतील ५०० व रॅपिड टेस्टमधील १३४ अहवालांचा समावेश आहे. निगेटिव्ह अहवालामध्ये प्रयोगशाळेतून ५५५, तर रॅपिड टेस्टमधील १,५८९ अहवालांचा समावेश आहे. पॉझिटिव्ह आलेल्या अहवालामध्ये बुलडाणा शहर ९५, तालुक्यातील रायपूर, पांगरी, सव, ढालसावंगी येथे प्रत्येकी एक रुग्ण आढळून आला आहे. मोताळा तालुक्यातील मूर्ती, धामणगाव बढे, धोनखेडा, टेंभी येथे तीन रुग्ण आढळून आले आहेत. खामगाव शहरात ३९, शेगाव पाच, मलकापूर शहर तीन, देऊळगाव राजा शहरात २९, सिंदखेड राजा शहरात १४, साखरखेर्डा येथे १५, नाव्हा येथे एक, मलकापूर पांग्रा दोन, मेहकर शहरात ४७, हिवरा आश्रम आठ, डोणगाव पाच, लव्हाळा पाच, संग्रामपूर शहरात एक, जळगाव जामोद शहरात एक, नांदुरा शहरात १०, वडनेर येथे ५५, लोणार शहरात १६, बिबी येथे ४, मांडवा पाच, मातमळ १०, कुऱ्हा चार, किन्ही सात, बोरी काकडे आठ, धायफळ चार व्यक्ती पॉझिटिव्ह आढळून आले आहेत. अशाप्रकारे जिल्ह्यात ६३४ रूग्ण आढळले आहे.

याठिकाणी झाले मृत्यू

उपचारादरम्यान धंदरवाडी ता. सिंदखेड राजा येथील ७९ वर्षीय पुरूष, सावरगाव डुकरे ता. चिखली येथील ६५ वर्षीय महिला, फर्दापूर ता. मोताळा येथील ६८ वर्षीय पुरूष, चौथा ता. बुलडाणा येथील ६५ वर्षीय महिला व मोताळा येथील ८० वर्षीय महिला रूग्णाचा मृत्यू झाला आहे.

Web Title: Five deaths due to corona in the district, 634 positive

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.