विदर्भात पाच जिल्ह्याची निर्मिती;खामगाव उपेक्षित का?
By Admin | Published: April 24, 2015 01:30 AM2015-04-24T01:30:43+5:302015-04-24T01:30:43+5:30
तीन मुख्यमंत्र्यांनी दिले आश्वासन तरीही वनवास कायम.
खामगाव(जि. बुलडाणा): खामगाव जिल्हा निर्मितीकडे सातत्यपूर्ण दुर्लक्ष केले जात असल्याची वस्तुस्थिती आहे. प्रस्तावित खामगाव जिल्ह्याच्या लोकसंख्येएवढे पाच जिल्हे विदर्भात असल्याने लोकसंख्येनुसार खामगाव जिल्हा निर्मितीला शासनस् तरावरून प्राधान्यक्रम द्यायला हवा, अशी मागणी आता जोर धरू लागली आहे. या पूर्वी तीन मुख्यमंत्र्यांनी आश्वासन दिले आहे; मात्र स्वतंत्र खामगाव जिल्हा निर्मितीची घोषणा प्रलंबित आहे. खामगाव शहरात अनेक महत्त्वपूर्ण कार्यालय असून, काही विभागांचे जिल्हास्तरीय कार्यालयसुद्धा खामगावात आहेत. खामगावची नगरपालिका ही जिल्ह्यात एकमेव असून, येथील कृषी उत्पन्न बाजार समिती पश्चिम विदर्भात सर्वात मोठी आहे. जिल्ह्यासह आसपासच्या जिल्ह्यातील शेतकरी येथे शेतमाल विक्रीसाठी आणतात. परिणामी येथील व्यापारपेठही मोठी असून, दररोज कोट्यवधींची उलाढाल होत अस ते. सोबतच जिल्ह्यात औद्योगिक वसाहत फक्त खामगाव येथेच आहे. तर वेगवेगळ्या उत्पादनाचे कारखाने या एमआयडीसीमध्ये सुरू आहेत. खामगाव जिल्हा झाल्यास येथे प्रशासकीय इमारत बांधण्याची अजिबात आवश्यकता नाही. एक प्रशस्त इमारत येथे अस्तित्वात आली आहे. त्यामुळे दहा लाख लोकसं ख्येच्या निकषानुसार नव्याने खामगाव जिल्हा ही घोषित करावा, अशी मागणी घाटा खालील सर्व तालुक्यांमधून जोर धरू लागली आहे. तर घोषणेची प्रतीक्षा आहे.