Khadakpurna: खडकपूर्णा प्रकल्पाचे पाच दरवाजे उघडले
By संदीप वानखेडे | Updated: August 7, 2022 17:16 IST2022-08-07T17:15:26+5:302022-08-07T17:16:21+5:30
Khadakpurna : बुलडाणा जिल्ह्यात दमदार पाऊस झाल्याने तीन मध्यम, तर एका माेठ्या प्रकल्पातून पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आला आहे. जिल्ह्यातील सर्वात माेठा प्रकल्प असलेल्या खडकपूर्णाचे पाच दरवाजे उघडण्यात आले आहेत.

Khadakpurna: खडकपूर्णा प्रकल्पाचे पाच दरवाजे उघडले
बुलडाणा - जिल्ह्यात दमदार पाऊस झाल्याने तीन मध्यम, तर एका माेठ्या प्रकल्पातून पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आला आहे. जिल्ह्यातील सर्वात माेठा प्रकल्प असलेल्या खडकपूर्णाचे पाच दरवाजे उघडण्यात आले आहेत तसेच इतर प्रकल्पांमध्ये जलसाठ्यात माेठ्या प्रमाणात वाढ झाली आहे.
जिल्ह्यातील विविध भागात काही दिवसांपासून चांगला पाऊस हाेत आहे. प्रकल्पांच्या क्षेत्रातही दमदार पाऊस झाल्याने मध्यम व माेठ्या प्रकल्पांमध्ये जलसाठ्यात चांगली वाढ झाली आहे. खडकपूर्णा प्रकल्पाचा जलसाठा ८४़ ४५ टक्क्यांवर पाेहचल्याने पाच दरवाजे उघडण्यात आले आहेत. तसेच त्यामधून १५५ क्युसेक पाण्याचा विसर्ग करण्यात येत आहे. मस, काेराडी, उतावळी हे मध्यम प्रकल्प ओव्हर फ्लाे झाले आहेत. मस प्रकल्पातून ९ क्युसेक, काेराडीतून १६.११, तर उतावळी प्रकल्पातून २.०४ क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरू आहे. प्रकल्पांमध्ये माेठ्या प्रमाणात जलसाठा उपलब्ध झाल्याने अनेक गावांचा पिण्याच्या पाण्याचा आणि सिंचनाचा प्रश्न मिटला आहे.