सांडव्यात अडकलेल्या तिघांना वाचविण्यासाठी गेलेल्या युवकाचा मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 22, 2020 10:38 AM2020-09-22T10:38:18+5:302020-09-22T10:38:34+5:30

कोराडी प्रकल्पाच्या सांडव्यात अडकलेल्या तिघांना वाचविण्यासाठी गेलेल्या युवकाचा सोमवारी मृत्यू झाला.

Five drowned; The bodies of both were found | सांडव्यात अडकलेल्या तिघांना वाचविण्यासाठी गेलेल्या युवकाचा मृत्यू

सांडव्यात अडकलेल्या तिघांना वाचविण्यासाठी गेलेल्या युवकाचा मृत्यू

Next


लोकमत न्यूज नेटवर्क
बुलडाणा : जिल्ह्यात वेगवेगळ््या घटनेत पाच जण बुडाले आहेत. त्यातील दोघांचे मृतदेह सापडले असून तिघांचा शोध घेण्यात येत आहे. खामगाव तालुक्यातील माक्ता कोक्ता येथील बापलेकांसह तिघे जण तर देउळगाव माळी येथील एक जण तर रामपूर येथील एकाचा यामध्ये समावेश आहे.
कोराडी प्रकल्पाच्या सांडव्यात अडकलेल्या तिघांना वाचविण्यासाठी गेलेल्या युवकाचा सोमवारी मृत्यू झाला.
देऊळगाव माळी येथील कोराडी प्रकल्प हा शंभर टक्के भरला आहे. त्यामुळे, सांडव्यावरुन पाण्याचा विसर्ग होत आहे. सोमवारी सकाळी कोराडी प्रकल्पावर आलेल्या काही युवकांनी या सांडव्यात पोहण्यासाठी उड्या घेतल्या.यापैकी शुभम दिनकर गवई(२२), संतोष सुखदेव माने (१८), विजयानंद किसन कुडके (२२), सलमान जाकीर पठान(२२), गोपाळ दत्ता जाधव(१८) राहणार देऊळगाव माळी या पाच अडकले होते. पाण्याच्या अति दाबामुळे त्यांना बाहेर पडता आले नाही. त्यांनी नदीपात्रातील सांडव्याच्या खाली असलेल्या झाडाझुडपांचा आधार घेतला होता. ही बाब प्रकल्पावर फिरायला आलेल्या काही नागरिकांच्या लक्षात आल्याने त्यांनी आरडाओरड करून ग्रामस्थांना प्रकल्पावर बोलावले. अडकलेल्या युवकांना वाचवण्यासाठी प्रयत्न सुरू केले. सकाळी सहाला सुरू झालेल्या या मोहिमेमध्ये अडकलेल्या युवकांना वाचविण्यासाठी आलम खाँ पठाण, मोहन विश्वनाथ मगर, विजय पुरुषोत्तम सुरुशे , अखिल खाँ पठाण , ऋषी चाळगे यांच्यासह गावातील इतर तरुणांनी प्रयत्न सुरू केले होते. या दरम्यान या प्रकरणाची माहिती मेहकर प्रशासनाला दिल्यावर तात्काळ मेहकर चे तहसीलदार डॉ. संजय गरकल, ठाणेदार आत्माराम प्रधान ,उपविभागीय अधिकारी गणेश राठोड हे त्यांच्या ताफ्यासह घटनास्थळी दाखल झाले. दुपारी दीड वाजेपर्यंत बचाव मोहिम सुरू होती. जवळपास साडेसात तास चाललेल्या या मोहिमेदरम्यान अडकलेला युवकांना सवाचविण्यात यश आले. मात्र यादरम्यान युवकांना वाचवण्यासाठी ज्या युवकांनी प्रयत्न केले त्यामधील विजय पुरुषोत्तम सुरुशे या युवकांचा मृत्यू झाला.त्यामुळे, गावात हळहळ व्यक्त होत आहे. तिघांना वाचिण्याच्या प्रयत्नात विजय सुरूशे या युवकाला आपले प्राण गमावावे लागले.प्रकल्पांवर जाण्यास मनाई करण्याची गरज आहे.

Web Title: Five drowned; The bodies of both were found

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.