कोरोनामुळे पाच जणांचा मृत्यू, १,१४३ जण पॉझिटिव्ह

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 13, 2021 04:35 AM2021-05-13T04:35:08+5:302021-05-13T04:35:08+5:30

दरम्यान पॉझिटिव्ह आलेल्या अहवालामध्ये बुलडाणा तालुक्यातील ११४, खामगाव मधील ११४, शेगाव मधील ७४, देऊळगाव राजा मधील ८२, चिखली मधील ...

Five killed by corona, 1,143 positive | कोरोनामुळे पाच जणांचा मृत्यू, १,१४३ जण पॉझिटिव्ह

कोरोनामुळे पाच जणांचा मृत्यू, १,१४३ जण पॉझिटिव्ह

Next

दरम्यान पॉझिटिव्ह आलेल्या अहवालामध्ये बुलडाणा तालुक्यातील ११४, खामगाव मधील ११४, शेगाव मधील ७४, देऊळगाव राजा मधील ८२, चिखली मधील ७९, मेहकर मधील ९८, मलकापूर मधील ४७, नांदुरा तालुक्यातील १३७, लोणार मधील ११०, मोताळ्या मधील ६२, जळगाव जामोद मधील ८१, सिंदखेड राजा मधील ९१, संग्रामपूर मधील ५१ जणांचा समावेश आहे. उपचारादरम्यान खामगावातील सुटाळा बु. येथील ६५ वर्षीय महिला, बोथाकाजी येथील ५६ वर्षीय महिला, मेहकर तालुक्यातील भालखेड येथील ६४ वर्षीय पुरुष, जळगाव जामोद मधील ८० वर्षीय पुरुष व ५० वर्षीय महिलेचा मृत्यू झाला. दरम्यान ४५६ जणांनी कोरोनावर मात केल्यामुळे त्यांना रुग्णालयातून सुटी देण्यात आली आहे तर आजपर्यंत ६८ हजार ६२६ बाधितांनी कोरोनावर मात केली आहे. आजपर्यंत तपासण्यात आलेल्या संदिग्धांपैकी ३ लाख ९४ हजार ६५९ जणांचे अहवाल निगेटिव्ह आले आहेत.

--२,९९६ जणांच्या अहवालाची प्रतीक्षा--

अद्यापही २,९९६ संदिग्धांच्या अहवालाची प्रतीक्षा आहे. जिल्ह्यातील एकूण बाधितांची संख्या आता ७३ हजार ८७८ झाली आहे. त्यापैकी ४,७६२ सक्रिय रुग्णांवर सध्या रुग्णालयामध्ये उपचार करण्यात येत आहेत. दरम्यान आजपर्यंत जिल्ह्यातील ४९० जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला असल्याची माहिती निवासी उपजिल्हाधिकारी दिनेश गिते यांनी दिली.

Web Title: Five killed by corona, 1,143 positive

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.