लोणार शहरालगत तब्बल पाच बिबट्यांचा वावर!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 4, 2017 12:34 AM2017-12-04T00:34:11+5:302017-12-04T00:35:05+5:30
लोणार : सरोवर काठावरील परिसरात शहरालगत तब्बल पाच बिबट्यांचा वार असल्याचे स्पष्ट झाले आहे. त्यामुळे शहराच्या काहीसे बाहेर राहत असलेल्या वसत्यांमध्ये घबराटीचे वातावरण आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
लोणार : सरोवर काठावरील परिसरात शहरालगत तब्बल पाच बिबट्यांचा वार असल्याचे स्पष्ट झाले आहे. त्यामुळे शहराच्या काहीसे बाहेर राहत असलेल्या वसत्यांमध्ये घबराटीचे वातावरण आहे.
दोन दिवसांपूर्वी जावळे यांची गाय बिबट्यांनी ठार केली होती, तर शनिवारी दोन कुत्र्यांनाही बिबट्यांनी ठार केले. आरएफओ सानप, वनरक्षक सोनुने, वनमजूर किसन जाधव, दिलीप राऊत, गुलाब जावळे हे घटनास्थळी दाखल झाले व सदर घटनेचा पंचनामा केला.
दरम्यान, मृत गाय तिथेच ठेवून सगळे निघून आले. यानंतर रात्री १0.३0 ते ११ वाजताच्या दरम्यान त्या ठिकाणी पाच बिबट दिसून आले. हे चारही बिबट परिसरातील शेतकर्यांनी बघितले. यानंतर या चार बिबट्यांमुळे त्या परिसरात शेतकर्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. या बिबट्यांचा त्वरित बंदोबस्त न केल्यास गुरांना मोठा धोका निर्माण झाला आहे. यात बिबट्याची एक जोडी व अन्य बछडे आहेत. या घटनेची माहिती मिळताच न.प. अध्यक्ष भूषण मापारी, नितीन शिंदे, पांडुरंग सरकटे, विजय मापारी यांनी त्या ठिकाणी भेट देऊन त्या बिबट्याला पिंजर्यात बंद करण्याची मागणी केली.
बिबट्याने १ डिसेंबर रोजी रात्रीदरम्यान रवी प्रकाश खरात यांच्या सरोवरजवळील शेतातील कोठय़ावरील कुत्र्यांवर हल्ला करीत २ कुत्र्यांना ठार केले. या घटनेनंतर शेतकर्यात पुन्हा घबराटीचे वातावरण आहे. यानंतर नगरसेवक अरुण जावळे, भरत जाधव, माणिक यांनी व वन कर्मचारी मुळे यांनी पंचनामा केला.