आणखी पाच जणांचा मृत्यू, ७७३ काेराेना पाॅझिटीव्ह

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 26, 2021 04:35 AM2021-03-26T04:35:05+5:302021-03-26T04:35:05+5:30

बुलडाणा : जिल्ह्यात काेराेनाचा कहर सुरूच असून गुरूवारी आणखी ५ जणांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. तसेच ७७३ जणांचा ...

Five more died, 773 Caraina positive | आणखी पाच जणांचा मृत्यू, ७७३ काेराेना पाॅझिटीव्ह

आणखी पाच जणांचा मृत्यू, ७७३ काेराेना पाॅझिटीव्ह

Next

बुलडाणा : जिल्ह्यात काेराेनाचा कहर सुरूच असून गुरूवारी आणखी ५ जणांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. तसेच ७७३ जणांचा काेराेना अहवाल पाॅझिटीव्ह आला आहे. गुरूवारी प्राप्त ४ हजार ९८९ कोरोना अहवाल 'निगेटिव्ह' आले असून ८०२ रूग्णांची काेराेनावर मात केल्याने त्यांना रुग्णालयातून सुटी देण्यात आली आहे. उपचारादरम्यान नांदुरा येथील ४९ वर्षीय पुरूष, पुंडलीक नगर चिखली येथील ७६ वर्षीय महिला, अंढेरा ता. दे. राजा येथील २९ वर्षीय पुरूष, शेलगांव बाजार ता. मोताळा येथील ८२ वर्षीय पुरूष व खामगांव येथील ७० वर्षीय महिला रूग्णाचा मृत्यू झाला आहे.

पाॅझिटीव्ह रुग्णांमध्ये खामगांव शहर ५९, सुटाळा बु ५, टेंभुर्णा ६, पि. राजा ५, जळका २, लोणार शहर १५, लोणार तालुका बिबी ५, देऊळगांव ६, खळेगाव ६, शिवणी पिसा ३, पिंपळनेर २, मातमळ २, सुलतानपूर २, शारा ३, कारेगांव १८, खुरमपूर १, मोताळा शहर १७, राहेरा ३, गुळभेली ३, बोराखेडी २, परडा ३, धा. बढे २, निपाणा २, मलकापूर शहर ५९, मलकापूर तालुका नरवेल २, पिंपळखुटा २, देवधाबा २, विवरा २, चिखली शहर ३७, चिखली तालुका कोलारा २, चंदनपूर २, किन्होळा ५, टाकरखेड १, मेहकर शहर २६, मेहकर तालुका डोणगांव १, नायगांव देशमुख ७, वडजीसीम २, जयताळा 1, दे. माळी २, मोहाडी १, कंभोळा २, परतापूर १, सोनार गव्हाण ४, मोळा १, अंजनी ७, लोणी गवळी १, हिवरा आश्रम ४, बुलडाणा शहर ७०, बुलडाणा तालुका धाड ५, सागवन २, रूईखेड १, नांद्राकोळी २, रायपूर २, दत्तपूर ४, मासरूळ २, माळवंडी १, देऊळघाट १, कोलवड १, संग्रामपूर शहर २, संग्रामपूर तालुका टुनकी ४, झाशी पळशी २, बोडखा १, शेगांव शहर ४५, सिं. राजा शहर ९ दे. राजा शहर ३१, दे. राजा तालुका तुळजापूर 1, अंभोरा २, खल्याळ गव्हाण ३, सुरा २, बायगांव बु ३, दे. मही ४, नागणगांव २, डोढ्रा १, नांदुरा शहर ६४, जळगांव जामोद शहरातील सहा जणांचा मावेश आहे.

आतापर्यंत २४५ जणांचा मृत्यू

आजपर्यंत एकूण निगेटिव्ह अहवाल१ लाख ९७ हजार ५१ आहेत. जिल्ह्यात आज अखेर एकूण ३३ हजार १०२ कोरोनाबाधित रूग्ण असून त्यापैकी २६ हजार ८३६ कोरोनाबाधीत रूग्णांनी कोरोनावर मात केल्यामुळे त्यांना वैद्यकीय प्रोटोकॉलप्रमाणे सुट्टी देण्यात आली आहे. त्यामुळे जिल्ह्यात सध्या रूग्णालयात ६ हजार २१ कोरोना बाधीत रूग्णांवर उपचार सुरू आहेत. तसेच आजपर्यंत २४५ कोरोनाबाधीतांचा मृत्यू झाला आहे, अशी माहिती निवासी उपजिल्हाधिकारी दिनेश गिते यांनी दिली आहे.

Web Title: Five more died, 773 Caraina positive

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.