बुलडाणा जिल्ह्यात पाच लघुपाटबंधारे प्रकल्प ‘ओव्हर फ्लो’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 18, 2020 11:12 AM2020-08-18T11:12:52+5:302020-08-18T11:13:00+5:30

बुलडाणा तालुक्यातील मातला, करडी, पळसखेड भट, कव्हळा ता. चिखली, तांबोळा ता. लोणार आदींचा समावेश आहे.

Five small scale irrigation projects 'overflow' in Buldana district | बुलडाणा जिल्ह्यात पाच लघुपाटबंधारे प्रकल्प ‘ओव्हर फ्लो’

बुलडाणा जिल्ह्यात पाच लघुपाटबंधारे प्रकल्प ‘ओव्हर फ्लो’

googlenewsNext

लोकमत न्यूज नेटवर्क
बुलडाणा : जिल्ह्यात पावसाची संततधार सुरू आहे. कुठे तुरळक, तर कुठे मध्यम स्वरूपाचा पाऊस होत आहे. त्यामुळे जिल्ह्यातील प्रकल्पांमध्ये जलसाठा वाढला आहे. १७ आॅगस्ट रोजी जिल्ह्यातील पाच लघु पाटबंधारे प्रकल्प १०० टक्के भरले. त्यामध्ये बुलडाणा तालुक्यातील मातला, करडी, पळसखेड भट, कव्हळा ता. चिखली, तांबोळा ता. लोणार आदींचा समावेश आहे.
पैनगंगा नदीवरील पेनटाकळी प्रकल्पाचे सर्व नऊ वक्रद्वारे २५ से.मी उघडण्यात आले आहे. नदीपात्रात ७८९० क्युसेक (२२३.४४ क्यूमेक) इतका विसर्ग सोडण्यात येत आहे. धरणामध्ये येणारी पाण्याची आवक पाहून विसर्ग वाढवणे/कमी करणे बाबत निर्णय घेण्यात येणार आहे. खडकपूर्णा नदीवरील खडकपूर्णा प्रकल्पाचे आठ वक्रद्वारे ३० से.मी ने व ११ वक्रद्वारे ६० से.मी. ने उघडण्यात आली आहेत. नदीपात्रात ३१ हजार ६५० क्यूसेक एवढा विसर्ग सोडण्यात येत आहे. पाण्याची आवक पाहून विसर्ग वाढविणे/कमी करणेबाबत पुढील निर्णय घेण्यात येणार आहे. नदी काठच्या गावांतील नागरिकांनी सतर्कतेचा इशारा प्रशासनाने दिला आहे.
नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा
मस व उतावळी प्रकल्पाच्या सांडव्यावरून नदीपात्रात पाणी येत आहे. करडी प्रकल्पाचे पाणी स्वयंचलीत दरवाजामधून नदीपात्रात येत आहे. त्यामुळे धाड ते माहोरा, धाड ते कुंबेफळ मार्गावर पाणी आले आहे. पर्यायाने हा मार्ग वाहतुकीसाठी बंद करण्यात आला आहे.
 बुलडाणा तालुक्यातील मातला प्रकल्प भरल्यामुळे नदी काठावरील मातला, रायपूर, सिंदखेड, सोनेवाडी व उंबरखेड गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. तसेच पळसखेड भट प्रकल्प भरल्यामुळे पळसखेड भट, पिंपळगाव सराई, रायपूर व सोनेवाडी गावांना सतर्कतेचा इशारा शाखाधिकारी, सिंचन शाखा, बुलडाणा यांनी दिला आहे.

Web Title: Five small scale irrigation projects 'overflow' in Buldana district

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.