गौण खनिजाची अवैध वाहतूक पाच टिप्पर पकडले; उपविभागीय पोलीस अधिकारी पथकाची कारवाई

By अनिल गवई | Published: August 9, 2023 01:29 PM2023-08-09T13:29:28+5:302023-08-09T13:31:53+5:30

पाचही टिप्पर ग्रामीण पोलीस स्टेशनला लावण्यात आले. त्यामुळे गौण खनिजाची अवैध वाहतूक करणार्यांमध्ये एकच खळबळ उडाली आहे.

Five tippers caught illegally transporting minor mineral; Action of Sub Divisional Police Officers Team | गौण खनिजाची अवैध वाहतूक पाच टिप्पर पकडले; उपविभागीय पोलीस अधिकारी पथकाची कारवाई

गौण खनिजाची अवैध वाहतूक पाच टिप्पर पकडले; उपविभागीय पोलीस अधिकारी पथकाची कारवाई

खामगाव : विना परवाना आणि रॉयल्टीशिवाय गौण खनिजाची वाहतूक करणारे पाच टिप्पर पकडण्यात आले. उपविभागीय पोलीस अधिकारी पथकाने ही कारवाई मंगळवारी उशीरारात्री टेंभूर्णा फाट्यावर केली. पाचही टिप्पर ग्रामीण पोलीस स्टेशनला लावण्यात आले. त्यामुळे गौण खनिजाची अवैध वाहतूक करणार्यांमध्ये एकच खळबळ उडाली आहे.

खामगाव अकोला महामार्गावरील टेंभूर्णा फाट्यावरील उड्डाण पुलाजवळून कोलोरीकडून पाच टिप्पर मधून गौण खनिजाची वाहतूक केल्या जात होती. उपविभागीय पोलीस अधिकारी पथकाने ही वाहने थांबवून चौकशी केली असता, त्यांच्याकडे वाहनांच्या कागदपत्रासह वाहतूक केल्या जाणार्या मुरूमाची रॉयल्टी आढळून आली नाही. त्यामुळे एमएच २० जीसी २२७६, एमएच २० जीसी २२८८, एमएच २० जीसी २२४५, एमएच २० जीसी २२४६,एमएच २० जीसी २२४७, ही वाहने ग्रामीण पोलीस स्टेशनला लावण्यात आली. यासंदर्भात पुढील कारवाईसाठी तहसील कार्यालयाला पत्र देण्यात आले. जिल्हा पोलीस अधिक्षक सुनिल कडासने, अपर पोलीस अधिक्षक अशोक थोरात यांच्या मार्गदर्शनात अपर पोलीस अधिक्षक विनोद ठाकरे, पोउपनि मनोज वासाडे, पोना सुधाकर थोरात, योगेश कुंवारे, नितेश लासुरकर यांनी ही कारवाई केली.

पाचही चालकांना समजपत्र
उपविभागीय पोलीस अधिकारी पथकाने पकडण्यात आलेली वाहने पोलीस स्टेशनला लावून नितेश रामकिशोर शर्मा २६, रा. शिवपूर जि. गढवा, झारखंड, सुरेंद्रकुमार रघुराय राम २६ रा. जोगा जि. पलामु झारखंड, अनिल किसन अंभोरे ३०, रा. चिचोंली जि. अकोला, अक्षय विश्वनाथ तायडे रा.गोरेगांव, जि. अकोला, विष्णू उत्तम नलावडे ३५ रा. रामनगर जि. अकोला या चालकांना पुढील कारवाईत सहकार्य करण्यासाठी समजपत्र देत, सोडून देण्यात आले.

Web Title: Five tippers caught illegally transporting minor mineral; Action of Sub Divisional Police Officers Team

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.