रेतीची अवैध वाहतूक करणारे पाच ट्रक पकडले

By admin | Published: August 26, 2015 11:48 PM2015-08-26T23:48:52+5:302015-08-26T23:48:52+5:30

जाफ्राबादकडून येणा-या बुलडाणा-धाड मार्गावर रेतीची वाहतूक करणारे चार ट्रक पकडले; अपर जिल्हाधिका-यांची कारवाई.

Five trucks carrying illegal transport were seized | रेतीची अवैध वाहतूक करणारे पाच ट्रक पकडले

रेतीची अवैध वाहतूक करणारे पाच ट्रक पकडले

Next

बुलडाणा : रॉयल्टी न भरता रेतीची चोरटी वाहतूक करणारे पाच ट्रक पकडण्यात आले. अपर जिल्हाधिकारी शिवानंद टाकसाळ यांनी स्वत: २६ ऑगस्ट रोजी ही कारवाई केली. यामध्ये धाड मार्गावर चार, तर येळगाव टोल नाक्यावर एक वाहन पकडण्यात आले. देऊळगावराजा तालुक्यात खडकपूर्णा नदीवर आणि जाफ्राबाद येथील नदीवर मोठय़ा प्रमाणावर रेतीघाट आहेत. बुलडाणा, चिखली, देऊळगावराजा तालुक्यात येणारी रेती ही मोठय़ा प्रमाणावर प्रशासनाचा कर चुकवून चोरट्या मार्गाने नेली जाते. यामध्ये प्रशासनातील काही अधिकारी कर्मचारी आणि पोलिसांचे सहकार्य माफियांना मिळते. अशा प्रकारे मोठय़ा प्रमाणावर चोरट्या मार्गाने रेतीची वाहतूक होत असल्याची माहीती अप्पर जिल्हाधिकारी शिवानंद टाकसाळ यांना मिळाल्यावरून त्यांनी बुधवारी सकाळी जाफ्राबादकडून येणार्‍या बुलडाणा-धाड मार्गावर रेतीची वाहतूक करणारे चार ट्रक पकडले. यापैकी एकाही ट्रकचालकाजवळ रॉयल्टी आढळून आली नाही. त्यामुळे ही वाहने तहसील कार्यालयात जमा करण्यात आली. दुपारी चिखली मार्गावरील येळगाव टोल नाक्यावर एक वाहन पकडण्यात आले. दरम्यान, अन्य दोन ट्रक अप्पर जिल्हाधिकार्‍यांचे वाहन पाहताच चालकांनी पळवले. त्यांच्यावरही कारवाई होणार असल्याची माहिती टाकसाळ यांनी दिली.

Web Title: Five trucks carrying illegal transport were seized

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.