बुलडाणा जिल्ह्यात कोरोनाचे पाच बळी, ६६५ पॉझिटिव्ह

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 3, 2021 11:13 AM2021-04-03T11:13:00+5:302021-04-03T11:13:17+5:30

Five victims of corona in Buldana district : जिल्ह्यात शुक्रवारी कोरोनाचे आणखी पाच बळी गेले आहेत.

Five victims of corona in Buldana district, 665 positive | बुलडाणा जिल्ह्यात कोरोनाचे पाच बळी, ६६५ पॉझिटिव्ह

बुलडाणा जिल्ह्यात कोरोनाचे पाच बळी, ६६५ पॉझिटिव्ह

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
बुलडाणा : जिल्ह्यात शुक्रवारी कोरोनाचे आणखी पाच बळी गेले आहेत. प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठविलेल्या व रॅपिड अँटीजेन टेस्ट किटद्वारे तपासलेल्या अहवालांपैकी एकूण ५ हजार ९८६ अहवाल प्राप्त झाले आहेत. यापैकी ५३२१ अहवाल कोरोना निगेटिव्ह असून ६६५ अहवाल पॉझिटिव्ह प्राप्त आले आहे.
प्राप्त पॉझिटिव्ह अहवालामध्ये प्रयोगशाळेतील ४०६ व रॅपीड टेस्टमधील २५९ अहवालांचा समावेश आहे. निगेटीव्ह अहवालामध्ये प्रयोगशाळेतून ४०४ तर रॅपिड टेस्टमधील ४९१७ अहवालांचा समावेश आहे. पॉझिटिव्ह आलेल्या अहवालामध्ये बुलडाणा शहरात ४९, तालुक्यात डोंगरखंडाळा, रायपूर, सुंदरखेड, पाडळी, पिं. सराई, चांडोळ, इरला, म्हसला, करडी, ढालसावंगी, रूईखेड, धाड, येळगांव, देऊळघाट, सागवन, कोलवड, भादोला याठिकाणी रुग्ण सापडले आहेत. मोताळा शहर १३, खामगांव शहर ४०, शेगांव शहर ४०, मलकापूर शहर १७, मलकापूर तालुक्यातील दाताळा ३, पिंपळखुटा दोन, धरणगांव तीन, दुधलगांव १, भालेगांव १, नरवेल १, देऊळगाव राजा शहर ११, दे. राजा तालुक्यातील सातेफळ २, सावखेड नागरे १, सिनगांव जहा दोन, खल्याळ गव्हाण २, सावखेड भोई २, पिंपळखुटा १, दे. मही ३, डोढ्रा एक, अंढेरा १ रुग्ण सापडला. सिंदखेड राजा शहरात २८, मेहकर शहर ४३, मेहकर तालुक्यातील गोहेगाव दोन, हिवरा आश्रम सहा, पांगरखेड एक, करंजी, सारंगपूर, लोणी गवळी, गुंजखेड, लव्हाळा चार, दे. माळी तीन, चिंचोली बोरे, अंजनी खु, शेंदला, पेनटाकळी, जानेफळ, मोहदरी, वाकड, मोहणा, डोणगांव पाच,  रुग्ण आढळून आले. संग्रामपूर शहरात १४, जळगांव जामोद शहरात १२, नांदुरा तालुक्यात बुर्टी दोन, पोटा दोन, लोणार शहरात १७, लोणार तालुक्यातील वढव दोन, रायगांव चार, बिबी, वझर आघाव, हत्ता, ताडेगांव, मातमळ, पहुर, सुलतानपूर २६, देऊळगांव चार व्यक्ती पॉझीटीव्ह आल्या आहेत. 


याठिकाणी झाले मृत्यू
जिल्ह्यात पाच कोरोनाबाधितांचा मृत्यू झाला आहे. त्यामध्ये बुलडाणा तालुक्यातील रायपूर येथील ६० वर्षीय पुरूष, छत्रपती नगर बुलडाणा येथील ६० वर्षीय पुरूष, मलकापूर तालुक्यातील पिंपळखुटा येथील ८० वर्षीय पुरूष, मेहकर तालुक्यातील लव्हाळा येथील ५३ वर्षीय पुरूष व मोताळा तालुक्यातील आव्हा येथील ५५ वर्षीय महिला रूग्णाचा मृत्यू झाला आहे.
 

Web Title: Five victims of corona in Buldana district, 665 positive

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.