पाच वर्षांपासून बोथाकाजीत दारूबंदी

By admin | Published: September 16, 2016 02:57 AM2016-09-16T02:57:14+5:302016-09-16T02:57:14+5:30

महिलांचा पुढाकारामुळे दारूबंदी शक्य; गावकरी व पोलिसांचे सहकार्य मोलाचे.

For five years, Bothakkajit Liquor | पाच वर्षांपासून बोथाकाजीत दारूबंदी

पाच वर्षांपासून बोथाकाजीत दारूबंदी

Next

खामगाव, दि. १५: दारूच्या व्यसनाने अनेकांचे संसार उद्ध्वस्त होत असल्याचे पाहून गावातून दारूबंदी कायमची बंद करण्यासाठी महिला सरसावल्या अन् गावात दारूबंदी घडवून आणली. खामगाव तालुक्यातील बोथाकाजी या गावात केवळ महिलांच्या पुढाकाराने मागील पाच वर्षांपासून दारूबंदी कायम आहे. याकरिता ग्रामस्थ व पोलिसांचे सहकार्य महत्त्वाचे ठरत आहे.
आजच्या संगणकीय युगात माणसाने तंत्रज्ञानात मोठी भरारी घेतली आहे. विशेषत: युवक वर्ग स्पर्धेच्या युगात थांबायला तयार नाही. मग ती शैक्षणिक, राजकीय वा सामाजिक बाब असो. युवक नेहमीच अग्रेसर राहिल्याच्या प्रयत्नात आहेत. माहिती व तंत्रज्ञानाच्या युगात एक पाऊल पुढे टाकत असताना युवक वर्ग व्यसनाच्या आहारी जाण्याचे प्रमाणही वाढत आहे. युवक व्यसनाच्या आहारी गेल्याने घरातील शांतता अबाधित राहत नाही व याचा प्रत्यक्ष, अप्रत्यक्षपणे कुटुंबातील सर्वांंंनाच नाहक त्रास सहन करावा लागतो. खामगाव तालुक्यातील बोथाकाजी गावात अनेक वर्षांपासून अवैधरीत्या दारू विक्री मोठय़ा प्रमाणात सुरू होती. त्यामुळे साहजिकच दारू पिणार्‍यांची संख्याही वाढतीच होती. म्हातार्‍यापासून तर युवकापर्यंत दारूचे लोण पसरले होते. परिणामी सण, उत्सव, लग्नकार्याच्या तसेच सार्वजनिक ठिकाणी अश्लील शिवीगाळ होत होती.

Web Title: For five years, Bothakkajit Liquor

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.