पाच वर्षात केवळ ७0५ जणांची विवाह नोंदणी
By Admin | Published: May 15, 2015 11:43 PM2015-05-15T23:43:18+5:302015-05-15T23:43:18+5:30
बुलडाणा नगरपालिकेत विवाह नोंदणी करण्याबाबत अनास्था, जनजागृती होणे गरजेचे.
बुलडाणा : विदेशात जाण्यासाठी आवश्यक असणारा पासपोर्ट, विविध शासकीय दाखले मिळविण्यासाठी आवश्यक असलेले विवाह नोंदणी पत्न देण्याचे अधिकार असलेल्या येथील नगरपालिका कार्यालयात पाच वर्षात अवघ्या ७0५ जणांनी विवाह नोंदणी केलेली आहे. नगरपालिका कार्यालयात प्रत्येकाची जन्म, मृत्यू, विवाह नोंदणी करणे कायद्याने सक्तीचे केले आहे. नगरविकास विभागाकडून विवाह नोंदणीचे अधिकार नगरपालिकेला दिलेले आहेत. बुलडाणा शहरातून परदेशात जाणार्यांची संख्या वाढली आहे. परदेश दौरा करण्यासाठी पासपोर्ट आवश्यक असतो. विविध शासकीय दाखले, राजपत्नात नाव नोंदणीसाठी, एवढेच नव्हे घटस्फोटासाठीसुद्धा विवाह नोंदणी करणे महत्त्वाचे आहे. बुलडाणा शहरात प्रत्येक वर्षी धुमधडाक्यात शेकडो विवाह होतात. लग्नकार्यासाठी लाखो रुपयांचा खर्चही होतो; परंतु विवाह नोंदणीकडे दुर्लक्ष केले जाते. तीच परिस्थिती ग्रामीण भागातही आहे. विवाह नोंदणीचे प्रमाण वाढविण्यासाठी त्या-त्या ग्रा.पं.चे सरपंच, तलाठी, ग्रामसेवक, मुख्याधिकारी आदींनी विवाह नोंदणीचे महत्त्व पटवून देऊन विवाह नोंदणीचे प्रमाण वाढविणे गरजेचे आहे; मात्र पाच वर्षात ७0५ जणांनी विवाह नोंदणी केलेली आहे, अशी माहिती विवाह नोंदणी विभागातील गजनन बदरखे, मुळे यांनी दिली.