वीर पत्नीच्या हस्ते ध्वजारोहण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 17, 2021 04:40 AM2021-08-17T04:40:12+5:302021-08-17T04:40:12+5:30
देऊळगाव राजा : डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ, अकोला संलग्नित समर्थ कृषी महाविद्यालयात वीरपत्नी मीनाताई रघुनाथ जायभाये यांच्या ...
देऊळगाव राजा : डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ, अकोला संलग्नित समर्थ कृषी महाविद्यालयात वीरपत्नी मीनाताई रघुनाथ जायभाये यांच्या हस्ते व समर्थ कृषी महाविद्यालयाचे अध्यक्ष देवानंद कायंदे यांच्या प्रमुख उपस्थितीत ध्वजारोहण करण्यात आलेे.
स्वातंत्र्य दिनाचे औचित्य साधून महाविद्यालयाचे अध्यक्ष देवानंद कायंदे यांनी, कोरोनाची सद्य:स्थिती पाहता सर्वांनी आपल्या आरोग्यास प्राथमिकता देऊन आपले कर्तव्य पार पाडावे तसेच कृषी क्षेत्रात विद्यार्थ्यांनी नवीन संशोधन करून शेतकऱ्यांच्या उपयोगी येणारे व कमी खर्चात सहज उपलब्ध होतील असे तंत्रज्ञान विकसित करावे, अशी अपेक्षा व्यक्त केली. प्राचार्य नितीन मेहेत्रे यांनी प्रास्ताविक केले. महाविद्यालयाचा उत्कर्ष व कृषिदूतांमार्फत परिसरातील शेतकऱ्यांना होत असलेला कृषिज्ञानाचा प्रचार व प्रसार तसेच सद्य:स्थितीत कोरोना विषाणूचा प्रभाव पाहता व्यक्तिगत स्वास्थ्याला प्राध्यान्य देऊन युवकांनी शिक्षणासोबतच शेतकऱ्यांना समजेल अशा माध्यमातून जास्तीत जास्त कृषिज्ञानाचा प्रसार करावा, जेणेकरून अल्पभूधारक शेतकरीदेखील सधन शेतकरी म्हणून ओळखला जाईल,असे विचार प्राचार्य नितीन मेहेत्रे यांनी व्यक्त केले. सूत्रसंचालन व आभारप्रदर्शन प्रा. मोहजितसिंह राजपूत यांनी केले. याप्रसंगी रामेश्वर जायभाये, गजानन घुगे, प्रा. गबाजी कुटे, दत्तात्रय घुले, समर्थ उच्च माध्यमिक विद्यालयाचे प्राचार्य सचिन घुगे तसेच समर्थ कृषी महाविद्यालय, समर्थ औषध निर्माणशास्त्र महाविद्यालय व समर्थ उच्च माध्यमिक विद्यालयाचे प्राध्यापक व कर्मचारी उपस्थित होते.