तुरीच्या गंजीला आग; दोन लाखाचे नुकसान
By admin | Published: February 7, 2017 02:58 AM2017-02-07T02:58:16+5:302017-02-07T02:58:16+5:30
रोहिणखेड येथील एका शेतक-याच्या तुरीच्या गंजीला अज्ञात इसमाने आग लावली.
रोहिणखेड (बुलडाणा), दि. ६-रोहिणखेड येथील एका शेतकर्याच्या शेतातील तुरीच्या गंजीला अज्ञात इसमाने आग लावून दिल्याने अंदाजे २ लाख रुपयांचे नुकसान झाले. ही घटना शनिवारी रात्री १२. ३0 वाजताच्या सुमारास घडली.
धामणगावबढे पोलीस स्टेशन अंतर्गत येणार्या रोहिणखेड येथील शेतकरी संजय शालीग्राम हिंगे यांनी फिर्याद दिली की, त्यांच्या गट नं १६२ मधील सहा एकर शेतात तर शैलेश हिंगे यांच्या गट नं १५७ मधील ४ एकर शेतात तुरीची गंजी लावून ठेवली होती. दोन लाख रुपये किमतीच्या आसपास तुरीपासून उत्पादन होण्याची अपेक्षा संजय हिंगे यांना होती. दरम्यान, ४ फेब्रुवारीच्या रात्रीतून अज्ञात इसमाने सदर तुरीच्या गंजीला आग लावून दिली.
रविवारी सकाळी तुरीची गंजी आगीने जळून खाक झाल्याचे त्यांना निदर्शनास पडले. यामध्ये सदर शेतकर्याचे दोन लाख रुपयांचे नुकसान झाल्याचे शेतकर्याने सांगितले. धा.बढे पोलिसांनी घटनास्थळी भेट देऊन पंचनामा केला असून, तुरीची गंजी खाक झाल्याने या शेतकर्यावर जणू आभाळच कोसळले आहे. याप्रकरणी संजय हिंगे यांनी अज्ञाताविरुद्ध फिर्याद दिली आहे.