फ्लिपकार्टची फ्रेंचाईसी मिळवून देण्याचे आमिष; महिलेची ८ लाखाने फसवणूक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 16, 2019 05:58 PM2019-11-16T17:58:02+5:302019-11-16T17:58:12+5:30
फ्लिपकार्ट व लॉजेस्टिक अॅन्ड ट्रान्सपोर्ट कंपनी या दोन्ही कंपन्यांची फ्रेंचाईसी मिळवून देण्याचे आमिष दाखवून त्यांना वेगवेगळ्या अकाऊंटमधये पैसे टाकण्यास सांगितले.
लोकमत न्यूज नेटवर्क
खामगाव : फ्लिपकार्टची फ्रेंचाईसी मिळवून देण्याचे आमिष दाखवून येथील वामननगर भागातील एका महिलेची ८ लाखाने फसवणूक केल्याची घटना उघडकीस आली. याप्रकरणी शहर पोलिसांनी महिलेच्या तक्रारीवरुन एकाविरुध्द फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे.
येथील वामननगर भागातील जैन नागडा सोसायटीमधील रहिवासी सौ.रेखा अमरसिंग ठाकूर यांनी शहर पोस्टेला तक्रार दिली की, हरीफैल येथील शेख इम्रान शेख दाऊद याने त्यांना व त्यांच्या पतीला त्याच्या परिचयातील विनोद उर्फ नंदु दादाराव तवर रा.शिवर जि.अकोला यांचेशी भेट करवून दिली. यावेळी विनोद तवर याने सौ.ठाकूर यांना फ्लिपकार्ट व लॉजेस्टिक अॅन्ड ट्रान्सपोर्ट कंपनी या दोन्ही कंपन्यांची फ्रेंचाईसी मिळवून देण्याचे आमिष दाखवून त्यांना वेगवेगळ्या अकाऊंटमधये पैसे टाकण्यास सांगितले. यावेळी सौ.ठाकूरयांनी त्यांच्यावर विश्वास ठेवून वेळोवेळी बँकेत ८ लाख ३८ हजार ६६७ रुपये ट्रान्सफर केले. मात्र विनोद तवर याने त्यांना फ्रेंचाईसी न देता फसवणूक केली. या तक्रारीवरुन पोलिसांनी विनोद तवर विरुध्द कलम ४२० भादंविनुसार गुन्हा दाखल केला आहे.