पूर्णा नदीला पुर; मानेगाव पुल पाण्याखाली, वाहतूक बंद 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 3, 2021 01:06 PM2021-10-03T13:06:36+5:302021-10-03T13:06:56+5:30

Flood the Purna river; नांदुरा - जळगावजामोद दरम्यानची वाहतूक या मार्गाने ठप्प झाली आहे .

Flood the Purna river; Manegaon bridge under water, traffic closed |  पूर्णा नदीला पुर; मानेगाव पुल पाण्याखाली, वाहतूक बंद 

 पूर्णा नदीला पुर; मानेगाव पुल पाण्याखाली, वाहतूक बंद 

googlenewsNext

 - सुहास वाघमारे

  नांदुरा: उपनद्यांना आलेला पूर व धरणातून पाण्याचा विसर्ग होत असल्याने पूर्णा नदी ओसंडून वाहत असून रविवार, ३ ऑक्टोबरच्या सकाळी अकरा वाजेदरम्यान मानेगाव येथील पुलावरुन पूर्णा नदीच्या पुराचे पाणी वाहू लागल्याने नांदुरा - जळगावजामोद दरम्यानची वाहतूक या मार्गाने ठप्प झाली आहे . मागील आठ दिवसांपासून पूर्णा नदी दुथडी भरून वाहत होती . रविवारी, ३  ऑक्टोबरच्या सकाळी पुराचे पाणी नांदुरा ते जळगाव दरम्यान मानेगाव नदीच्या पुलावरून वाहू लागल्याने या मार्गाची वाहतूक ठप्प झाली आहे . जळगाव जामोदला जाण्यासाठी खिरोडा व मांडवा या दोन उंच पुलांची कामे पूर्ण झाल्याने यावरुन आता वाहनधारकांना जावे लागत आहे. तर मागील दशकापासून सुरू असलेले एरळीजवळील पुलाचे काम जलदगतीने पूर्ण करणे गरजेचे झाले आहे .

Web Title: Flood the Purna river; Manegaon bridge under water, traffic closed

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.