जळतणाची लाकडे जातात परराज्यात
By admin | Published: May 15, 2015 01:06 AM2015-05-15T01:06:34+5:302015-05-15T01:06:34+5:30
डोणगाव येथे जळतणाच्या नावावर अवैध वृक्षतोड.
डोणगाव (जि. बुलडाणा): डोणगाव येथे सध्या जळतणाच्या नावावर अवैध वृक्षतोड करून तोडलेल्या लाकडांची परराज्यात विक्री होत आहे. या प्रकारामुळे परिसरातील झाडांना सध्या जळतणाच्या नावावर कुर्हाड चालत असताना महसूल विभाग मात्र गप्प आहे. डोणगाव परिसरातील वृक्षांना जीवनदान देण्यासाठी या प्रकारवर आळा घालण्यासाठी वनविभागाने ठोस पावले उचलावी, अशी मागणी नागरिकांमधून होत आहे. सध्या डोणगाव परिसरात बाभूळ या वृक्षाची जळतणाच्या नावावर सर्रास तोड सुरू आहे. एका वृक्षतोडीसाठी परवानगी न घेता काही लोकांकडून सर्रास दररोज शेकडो वृक्षांची तोड केल्या जात आहे. सदर वृक्षाच्या खोडाची साठवण करून सदर लकडी ही परराज्यात विक्री करून आर्थिक नफा कमविल्या जात आहे. या हव्यासापोटी शेकडो बाभळीची तोड सुरू आहे. स् थानिक वनविभाग व पटवारी कार्यालयासमोरून तोडलेल्या वृक्षाची टॅक्टरमधून वाहतूक होत असताना सदर वनविभाग आणि महसूल मात्र बघ्याची भूमिका घेत आहे. डोणगाव परिसरात सध्या वृक्षतोडीला उधान आले असून, रात्री अपरात्री वृक्षाची वाहतूक होत असल्याने पर्यावरण संतुलनाला धोका निर्माण झाला आहे. वनक्षेत्र कमी होत असल्याचे दिसून येत आहे.