बालाजींच्या चरणी कुरिअरने आली पुणे, मुंबईची हार, फुले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 15, 2019 03:59 PM2019-12-15T15:59:46+5:302019-12-15T16:01:38+5:30

गेल्या १४ दिवसांपासून सुरू असलेल्या उत्सवादरम्यान बालाजींच्या चरणी कुरिअरने पुणे, मुंबईची फुले व हार आले.

Flowers and garland from Pune, Mumbai came through Courier to Balaji's temple | बालाजींच्या चरणी कुरिअरने आली पुणे, मुंबईची हार, फुले

बालाजींच्या चरणी कुरिअरने आली पुणे, मुंबईची हार, फुले

Next

- ब्रम्हानंद जाधव  
लोकमत न्यूज नेटवर्क
बुलडाणा : आशियातील सर्वात मोठी मूर्ती असलेल्या मेहकर येथील शारंगधर बालाजींच्या लोकोत्सवाला १५ वर्ष पूर्ण होत आहेत. गेल्या १४ दिवसांपासून सुरू असलेल्या उत्सवादरम्यान बालाजींच्या चरणी कुरिअरने पुणे, मुंबईची फुले व हार आले. बालाजींच्या विविध पोषाखाने भक्तांना वेगवेगळ्या देवी-देवतांचे दर्शनही घडले.
सर्वात मोठे शिल्प व एकाच काळ्या दगडात बनविलेली शारंगधर बालाजी मुर्ती मेहकरसोबतच जिल्ह्याचेही वैभव आहे. मेहकर येथील भगवान शारंगधर बालाजीचे मंदिर शेकडो वर्षांहून जुने आहे. येथील बालाजींचा भक्तवर्ग महाराष्ट्रबरोबरच परराज्यातही आहे. पूर्वी मंदिरातच छोट्या स्वरूपात हा उत्सव पार पडत होता. आता गेल्या १४ वर्षापासून बालाजींचा उत्सव लोकोत्सव झालेला आहे. १ ते १४ डिसेंबर या कालावधीत बालाजी मंदिरात उत्सव पार पडला. या उत्सवाच्या काळात बालाजींसाठी मुंबई, पुणे येथील काही भक्तांनी कुरिअरने वेगवेगळ्या फुलांच्या माळा पाठविल्या. काहींनी बसवर फुलांचे हार पाठविले. तर काही भाविक स्वत: दर्शनासाठी आले. राज्यभरातून येथे भाविकांनी हजेरी लावली. दररोजच्या वेगवेगळ्या आभूषणांनी बालाजींना सजविण्यात आले. वारनिहाय देवी-देवतांचे पोषाख बालाजींना घालण्यात आले. भाविकांनाही आपसुकच वेगवेगळ्या देवतांच्या दर्शनाचा लाभ बालाजींच्या रुपाने घेता आले.

मनमोहक रुप

वारनिहाय पोषाख व सोने, चांदी आभूषणांनी सजविलेले बालाजींचे मनमोहक रुप भाविकांचे लक्ष वेधणारे होते.


असा होता पोषाख

रविवारी सुर्यनारायण, सोमवारी भगवान शंकरजी, मंगळवारी जगदंबा देवी, बुधवारी विठ्ठल, गुरूवारी दत्तात्रय, शुक्रवारी बालाजी, शनिवारी नृसिंहाचा पोषाख बालाजींना होता. मंगळवारी मिरवणूक काढण्यात आल्याने महापोषाखात बालाजींचे दर्शन भाविकांना झाले.

Web Title: Flowers and garland from Pune, Mumbai came through Courier to Balaji's temple

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.