सण-उत्सवात फुलांच्या भावात दुप्पटीने वाढ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 12, 2018 01:05 PM2018-09-12T13:05:33+5:302018-09-12T13:06:33+5:30
गणेशोत्सवामध्ये फळ व फुलांची मागणी वाढते; त्या पार्श्वभूमीवर सण-उत्सवात १२ सप्टेंबरपासून विविध फुलांच्या भावात दुप्पटीने वाढ झाली आहे.
- ब्रम्हानंद जाधव
बुलडाणा: देशभरामध्ये निर्माण झालेल्या इंधन दरवाढीच्या विघ्नात आता फळ व फुलेही माघे राहिली नाहीत. गणेशोत्सवामध्ये फळ व फुलांची मागणी वाढते; त्या पार्श्वभूमीवर सण-उत्सवात १२ सप्टेंबरपासून विविध फुलांच्या भावात दुप्पटीने वाढ झाली आहे. २०० ते २५० रुपये शेकडा मिळणारा गुलाब आता ५०० रुपयावर पोहचल्याने फुलातूनही महागाईचा सुगंध येत आहे.
महागाईच्या विघ्नाने भारत बंदला दोन दिवस होत नाही तोच सण उत्सवामध्ये आवश्यक असलेल्या विविध वस्तुंचे भाव वधारल्याचे चित्र दिसून येत आहे. सणासुदीच्या तोंडावर इंधन दरवाढीचे कारण पुढे करीत अनेक वस्तुंचे भाव वाढविण्यात आले आहेत. विघ्नहर्ता गणेशाचे आगमन १३ सप्टेंबरला होत असून १५ सप्टेंबरला घरोघरी गौरी विराजमान होत आहेत. सण, उत्सावाच्या पुजेमध्ये महत्वाचे स्थान असलेल्या फुलांचे भाव तेजीत आहे. मागील आठवड्यात मिळणाºया एक किलो फुलांसाठी लागणारे पैसे आता एक पाव फुलासाठी मोजावे लागत आहेत. १० व ११ सप्टेंबरला फुलांच्या भावामध्ये मोठी चढ-उतार झाल्याचे दिसून येते. मंगळवारपर्यंत मिळणाºया फुलांचे प्रतिकिलोचे दर बुधवारपासून दुप्पटीने वाढले आहेत. पिवळी शेवंती मागील आठवड्यात ४० ते ५० रुपये प्रतिकिलो मिळत होती, आता त्यासाठी १०० ते १५० रुपये लागणार आहेत. पांढरी शेवंती ६० ते ७० रुपये होती त्याचे भाव १५० ते २०० रुपये झाले आहेत. निशिगंध १०० रुपयांवरून ३५० रुपयांवर पोहचला आहे. गुलाब २०० ते २५० रुपये शेकडा असून आता ४५० ते ५०० रुपये भाव झाले आहेत. झेंडु प्रतिकिलो १० ते १२ रुपये होता, आता ६० ते ७० रुपये किलो आहे. आस्टर नावाचे फुल ६० ते ७० रुपये होते, आता १५० ते २०० रुपये आहे. लिली बंडल १५ ते २० रुपये असून आता ३० ते ४० रुपये मोजावे लागणार आहेत.
वºहाडात पश्चिम महाराष्ट्रातील फुले
पश्चिम वºहाडातील अकोला, बुलडाणा, वाशिम या भागात फुल शेती करणाºयांचे प्रमाण कमी आहे. झेंडू वगळता इतर फुले बोटावर मोजण्या इतकेच सापडतात. पश्चिम महाराष्ट्रातून वºहाडात फुलांची आवक होत आहे. सध्या अहमदनगर, पुणे आणि जळगाव येथूनही वेगवेगळ्या फुलांची आवक बुलडाणा, वाशिम व अकोला जिल्ह्यात होत आहे.
फळांचाही गोडवा महागला
गणेश उत्सवामध्ये फळांना महत्व असते. परंतू फळांचे भाव प्रति किलो २० ते ३० रुपयांनी वाढल्याने भाविकांसाठी फळांचाही गोडवा महागल्याचे दिसून येत आहे. सध्या सपरचंद १०० ते १५० रुपये, डाळींब ६० ते ८० रुपये, केळी ३० रुपये असल्याची माहिती फळ विक्रेते चंद्रभान उबाळे यांनी दिली आहे.
सण उत्सवाच्यातोंडावर फुलांच्या दरात वाढ झाली आहे. गौरी पुजनाला व समोर येणाºया सण उत्सवामध्ये अजुनही भाव वाढण्याची शक्यता आहे.
-राजेंद्र ठेंग,
फुल विक्रेते, बुलडाणा.