ऐन ग्रीष्मात खडकपूर्णा नदी झाली वाहती!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 6, 2018 12:52 AM2018-05-06T00:52:01+5:302018-05-06T00:52:01+5:30
देऊळगाव मही: घाटावरील तीन तालुक्याच्या पिण्याच्या पाण्याचा गंभीर बनलेला प्रश्न पाहता खडकपूर्णा प्रकल्पातून नदीपात्रात सहा दलघमी पाणी सोडण्यात आल्याने देऊळगाव महीनजीक प्रवाह खंडित झालेल्या खडकपूर्णा नदीत ऐन ग्रीष्मात पाणी खळखळत असल्याचे पाहून अनेकांच्या दिलासा मिळत आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
देऊळगाव मही: घाटावरील तीन तालुक्याच्या पिण्याच्या पाण्याचा गंभीर बनलेला प्रश्न पाहता खडकपूर्णा प्रकल्पातून नदीपात्रात सहा दलघमी पाणी सोडण्यात आल्याने देऊळगाव महीनजीक प्रवाह खंडित झालेल्या खडकपूर्णा नदीत ऐन ग्रीष्मात पाणी खळखळत असल्याचे पाहून अनेकांच्या दिलासा मिळत आहे.
त्यामुळे चिखली-देऊळगाव राजा मार्गावर प्रवास करणारे अनेक जण नदीकाठी पुलाच्या बाजूला वाहने लावून या काळ््याशार वाहत्या पाण्यात मनसोक्त डुबकी मारण्याचा आनंद घेत आहे. अवर्षणसदृश स्थितीत नदीपात्रातील पाणी पाहून अनेकांना आश्चर्याचा धक्का बसत आहे, तर लग्न समारंभासाठी जाणाºया वºहाडी मंडळींसाठीही येथील पाण्याची डुबकी ही आनंदाची पर्वणी घेऊन आली आहे. परभणी जिल्ह्यातून लग्नासाठी आलेल्या अनेक वºहाडींनी या नदीपात्रात पाण्यात डुबकी घेतली.
दरम्यान, आणखी दोन दिवस हे पाणी नदीपात्रातून वाहणार असून, खडकपूर्णा नदीवरील वायाळा, दुसरबीड आणि दिवखेड येथील कोल्हापुरी बंधारे भरल्यानंतर प्रकल्पाचे दोन्ही गेट बंद करण्यात येणार आहे; मात्र सोडण्यात आलेल्या या पाण्यामुळे परिसरातील गुरांच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सुटला आहे.
रेती माफियांनाही चाप!
कोरड्या पडलेल्या खडकपूर्णा नदीपात्रातून रेती माफियांनीही रेतीचा उपसा सुरू केला होता. महसूल विभागानेही त्यांच्यावर कारवाई केली; पण छुप्या पद्धतीने रेतीचा अवैध उपसा काही ठिकाणी सुरू आहे; परंतु आता नदीपात्रात पाणी सोडण्यात आल्याने या पाण्यातून रेतीचा उपसा करणे रेतीमाफियांना तूर्तास तरी शक्य नाही. त्या पद्धतीची साधने त्यांच्याकडे नाहीत. सोबतच त्यांची वाहनेही नदीपात्रात आता जाऊ शकणार नसल्याने किमान तीन ते चार दिवस तरी महसूल विभागाने सुटकेचा नि:श्वास सोडला आहे.