पिकांवर आर्द्रतायुक्त धुक्याचे संकट!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 18, 2019 03:21 PM2019-12-18T15:21:55+5:302019-12-18T15:22:27+5:30
या धुक्यामुळे तूर पिकांना फुलगळतीचा सामना करावा लागत आहे. तर तुरीच्या शेंगाही काळ्या पडण्याचा धोका आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
बुलडाणा: आर्द्रतायुक्त धुक्याचे प्रमाण वाढल्याने पश्चिम विदर्भातील ४ लाख २७ हजार हेक्टरवरील तूर पीक संकटात सापडले आहे. या धुक्यामुळे तूर पिकांना फुलगळतीचा सामना करावा लागत आहे. तर तुरीच्या शेंगाही काळ्या पडण्याचा धोका आहे.
पश्चिम वºहाडातील शेतकरी यंदा परतीच्या पावसाने हैराण झाले. खरीप हंगामाच्या शेवटी आलेल्या अतिपावसाने शेतकऱ्यांना मोठा फटका बसला. ते नुकसान रब्बी हंगामात भरून काढण्याच्या आशेवर असलेल्या शेतकऱ्यांना वारंवार विविध संकटांचा सामना करावा लागत आहे. अतिपावसामुळे ज्या शेतात पाणी साचले त्या शेतातील तूर पिकाची उभे झाडी वाळून गेली. चिभडीच्या शेतातील तूर नष्ट झाली; मात्र ज्या शेतातील पाण्याचा वापसा लवकर झाला त्याठिकाणचे तूर पिकाची परिस्थिती चांगली आहे. मात्र त्या तुरीवरही आता आर्द्रतायुक्त धुक्याचे नवे संकट निर्माण झाले आहे. अमरावती विभागामध्ये तूर पिकाचे सरासरी क्षेत्र ४ लाख ११ हजार ४८६ हेक्टर आहे. त्यापैकी सुमारे १०४ टक्के तूर लागवड करण्यात आलेली आहे. ४ लाख २७ हजार ८०४ हेक्टर क्षेत्रावर तूर असून आद्रतायुक्त धुक्याचा परिणाम या पिकावर आता जाणवायला लागला आहे. पश्चिम वºहाडातील तूर पिक सध्या फुलांनी बहरलेली आहे. तर काही ठिकाणची तूर शेंगा भरण्याच्या अवस्थेत आहे. परंतू सध्या निर्माण झालेल्या धुक्यामुळे फुलांना गळती लागली आहे. या धुक्यात आद्रतेचे प्रमाण जास्त असल्याने तुरीच्या शेंगा काळ्या पडण्याचा धोका अधिक आहे.
धुक्याचे प्रमाण वाढल्याने फुलात असलेल्या पिकांवरील फुले गळती होण्याचा धोका आहे. शेंगा लागलेल्या ठिकाणी हिरवी अळी पडू शकते. शेतकºयांची योग्य ती काळजी घेऊन कृषी विभागाच्या सल्ल्यानुसार फवारणी करावी.
- डॉ.सी.पी.जायभाये,
कृषी शास्त्रज्ञ, बुलडाणा.