काेराेनाविषयक नियमांचे पालन करावे : मापारी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 7, 2021 04:31 AM2021-03-07T04:31:48+5:302021-03-07T04:31:48+5:30

लाेणार : कोरोना प्रादुर्भाव रोखण्यासाठी नागरिकांनी नियमितपणे मास्क लावावे, सॅनिटायझरचा वापर करत राहावा, असे आवाहन शिवछत्र मित्र मंडळाचे नंदकिशोर ...

Follow the rules regarding carina: Mapari | काेराेनाविषयक नियमांचे पालन करावे : मापारी

काेराेनाविषयक नियमांचे पालन करावे : मापारी

Next

लाेणार : कोरोना प्रादुर्भाव रोखण्यासाठी नागरिकांनी नियमितपणे मास्क लावावे, सॅनिटायझरचा वापर करत राहावा, असे आवाहन शिवछत्र मित्र मंडळाचे नंदकिशोर मापारी यांनी केले. ते लाेणार येथे आयाेजित कार्यक्रमात बाेलत हाेते. या कार्यक्रमाचे प्रमुख पोलीस निरीक्षक रवींद्र देशमुख, उपनिरीक्षक भारत बरडे, उपनिरीक्षक सूरज काळे होते.

नुकसानग्रस्त शेतकरी पीक विम्याच्या प्रतीक्षेत

धाड : परिसरात अतिवृष्टीमुळे खरीप पिकांचे माेठ्या प्रमाणात नुकसान झाले हाेते. परिसरातील अनेक शेतकऱ्यांनी विमा काढला हाेता. मात्र, या शेतकऱ्यांना विम्याचा लाभ मिळाला नाही. याकडे वरिष्ठांनी लक्ष देऊन नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना मदत देण्याची मागणी हाेत आहे.

लॉकडाऊनऐवजी पर्यायी मार्ग काढा

बुलडाणा : काेराेना रुग्णसंख्या वाढत असल्याने जिल्हा प्रशासनाने लॉकडाऊन सुरू केले आहे. त्यामुळे व्यापाऱ्यांचे माेठ्या प्रमाणात नुकसान हाेत आहे. त्यातून मार्ग काढावा, अशी मागणी जिल्हाभरातील व्यापाऱ्यांनी केली आहे.

अमडापूर परिसरात जंतनाशक गाेळ्यांचे वितरण

अमडापूर : परिसरात आशा स्वयंसेविकांच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना जंतनाशक गाेळ्यांचे वितरण करण्यात येत आहे. शाळा बंद असल्याने घराेघरी जाऊन गाेळ्यांचे वितरण सुरू आहे. आतड्यांचा कृमी आजार हाेऊ नये यासाठी जंतनाशक गाेळ्यांचे वाटप करण्यात येते.

सरपंच निवडणुकीसाठी इच्छुकांची फिल्डिंग

माेताळा : तालुक्यातील पाच गावांच्या सरपंचपदाचे आरक्षण बदलण्यात आले आहे. आता या गावातील इच्छुकांना सरपंच निवडणुकीची प्रतीक्षा आहे. तसेच अनेकांनी फिल्डिंग लावली आहे. लवकरच या निवडणुका हाेणार असल्याचे संकेत आहेत.

Web Title: Follow the rules regarding carina: Mapari

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.