काेराेनाविषयक नियमांचे पालन करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 21, 2021 05:05 AM2021-02-21T05:05:18+5:302021-02-21T05:05:18+5:30

आठवडी बाजार बंद झाल्याने व्यावसायिकांना फटका जानेफळ : काेराेनाच्या वाढत्या संसर्गामुळे येथे शनिवारी भरणारा आठवडी बाजार ग्रामपंचायत प्रशासनाने रद्द ...

Follow the rules regarding carnea | काेराेनाविषयक नियमांचे पालन करा

काेराेनाविषयक नियमांचे पालन करा

Next

आठवडी बाजार बंद झाल्याने व्यावसायिकांना फटका

जानेफळ : काेराेनाच्या वाढत्या संसर्गामुळे येथे शनिवारी भरणारा आठवडी बाजार ग्रामपंचायत प्रशासनाने रद्द केला. या बाजारात परिसरातील अनेक व्यावसायिक आपली दुकाने मांडतात. बाजार रद्द झाल्याने त्यांना आर्थिक फटका बसला आहे.

जिल्हा परिषद शाळेतील प्रसाधनगृहांची दुरवस्था

धाड : परिसरातील अनेक गावातील जि. प. शाळांमधील प्रसाधनगृहांची दुरवस्था झाली आहे. काेराेनामुळे शाळा बंद हाेत्या. काही दिवसांपूर्वीच शाळा सुरू करण्यात आल्या हाेत्या. शाळा पुन्हा बंद करण्यात आल्या आहेत. शाळा बंद असताना प्रसाधनगृहांची दुरवस्था झाली आहे.

लघुपाटबंधारे विभागातील रिक्त पदे भरा

बुलडाणा : पाटबंधारे विभागात वर्षभरापासून पदभरती न झाल्याने रिक्त पदांची संख्या वाढली आहे. अधिकारी व कर्मचारी यांच्यावर कार्यभार वाढल्याचे चित्र आहे. त्यामुळे पाणी असून, सिंचन नियोजन होत नसल्याने शेतकऱ्यांमध्ये प्रचंड नाराजी पसरल्याचे दिसून येत आहे. रिक्त पदे भरण्याची मागणी कर्मचाऱ्यांमधून होत आहे.

किनगाव राजा ग्रामपंचायतीमध्ये शिवजयंती

किनगाव राजा : ग्रामपंचायत कार्यालयात शिवजयंतीनिमित्त छत्रपती शिवाजी महाराजांना अभिवादन करण्यात आले. यावेळी सरपंचपदी ज्ञानेश्वर कायंदे, शिवाजीराव काळुसे, सुनील झाेरे आदींसह इतर मान्यवर उपस्थित हाेते.

देवाजी बाेर्डे यांना अभिवादन

बुलडाणा : डाॅ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या खंदे समर्थक व दलित चळवळतील कार्यकर्ते देवाजी बाळाजी बाेर्डे आणि बळीराम देवाजी बाेर्डे यांना सामाजिक न्याय भवान येथे अभिवादन करणयात आले. बाेर्डे पिता पुत्रांचे कार्य विसरता येणार नसल्याचे प्रतिपादन सेवानिवृत्त न्यायाधीश सुरेश घाेरपडे यांनी केले.

पेट्राेल, डिझेल दरवाढीचा शेतकऱ्यांना फटका

बुलडाणा : वाढत्या पेट्रोल, डिझेलच्या दराचा शेतकऱ्यांनाही फटका बसत आहे. महागाईमध्ये शेतकरी होरपळून निघत आहे. पेट्रोल, डिझेलचे दर वाढल्याने ट्रॅक्टरमालकांनी शेती मशागतीचे दर वाढविले आहेत. सध्या तूर, हरभरा काढण्याचा हंगाम सुरू असल्याने ३०० रुपये एका पोत्यामागे शेतकऱ्यांना द्यावे लागत आहेत. यामुळे शेतकरी अडचणीत सापडले आहेत.

ग्रामपंचायत कर्मचारी युनियनच्या तालुकाध्यक्षपदी बोरे

मेहकर : ग्रामपंचायत कर्मचारी युनियनच्या तालुका अध्यक्षपदी परमेश्वर बोरे यांची अविरोध निवड करण्यात आली. या तालुका कार्यकारिणीमध्ये सचिव गणेश जंजाळ, उपाध्यक्ष सय्यद रफिक यांची नियुक्ती करण्यात आली. या वेळी तालुक्यातील ग्रामपंचायतीचे सर्व कर्मचारी पंचायत समितीला मेहकर येथे उपस्थित होते.

Web Title: Follow the rules regarding carnea

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.