२२ मजुरांना अन्नातून विषबाधा

By admin | Published: October 17, 2016 02:35 AM2016-10-17T02:35:24+5:302016-10-17T02:35:24+5:30

बुलडाणा जिल्ह्यातील जिगाव प्रकल्प येथील घटना.

Food poisoning to 22 laborers | २२ मजुरांना अन्नातून विषबाधा

२२ मजुरांना अन्नातून विषबाधा

Next

खामगाव, दि. १६- जिगाव प्रकल्प येथे काम करणार्‍या २२ मजुरांना अन्नातून विषबाधा झाल्याची घटना रविवारी घडली. सर्व रुग्णांवर स्थानिक सामान्य रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यांच्यावर उपचार सुरु आहेत.
नांदुरा तालुक्यातील जिगाव येथे प्रकल्पाचे काम सुरु आहे. या प्रकल्पावर परप्रांतीय मजुर कामासाठी आले आहेत. कामावरील मजुरांना दररोज मेसचे जेवण देण्यात येते. रविवारी सकाळी मजुरांनी जेवण केल्यानंतर त्यांना मळमळ होणे. पोट दुखणे, अंग खाजवणे, ताप आदी त्रास सुरु झाले. सुमारे २२ मजुरांना एकाचवेळी त्रास सुरु झाल्यामुळे संबंधित कंत्राटदाराने सर्व मजुरांना स्थानिक सामान्य रुग्णालयात दुपारच्या सुमारास उपचारासाठी दाखल केले. रुग्णांवर उपचार सुरु असून सर्व रुग्णांची प्रकृती धोक्याबाहेर असल्याचे वैद्यकिय सुत्रांनी सांगितले.

-बोअरचे पाणी पिल्यामुळे त्रासाची शक्यता
जिगाव प्रकल्पावर चारशेच्या जवळपास मजुर कामावर आहेत. राज्यातील मजुराबरोबर येथे मध्यप्रदेश व आंध्रप्रदेशातील मजुरांचाही समावेश आहे. या मजुरांना जेवणासाठी मेसची व्यवस्था केलेली आहे. तसेच पिण्याच्या पाण्यासाठी बोअरमधील पाण्याचा वापर केल्या जातो. नवीन बोअरचे पाणी पिल्यामुळे पोटात त्रास वाढल्याचे रुग्णांनी सांगितले. मजुरांसाठी पिण्याचे पाणी बोअरमधून टँकरमध्ये तर टँकरमधून पाण्याच्या टाक्यात टाकले जाते. बोअरच्या पाण्याची योग्य फिल्टर न झाल्यामुळे मजुरांना त्रास वाढल्याची शक्यता वर्तविली जात आहे.

Web Title: Food poisoning to 22 laborers

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.