खामगावात दुकाने बंद करण्यासाठी जबरदस्ती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 29, 2020 12:19 PM2020-09-29T12:19:07+5:302020-09-29T12:19:38+5:30

दुकानदारांमध्ये या दडपशाहीविरूद्ध रोष निर्माण होत आहे.

Forced to close shops in Khamgaon | खामगावात दुकाने बंद करण्यासाठी जबरदस्ती

खामगावात दुकाने बंद करण्यासाठी जबरदस्ती

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
खामगाव : शहरातील मुख्य रस्त्यावर असलेल्या किरकोळ व्यावसायिकांसह दुकानदारांना नगर परिषदेचे कर्मचारी तसेच पोलिस धाकदपटशा करून दुकाने बंद करायला लावत आहेत. जनता कर्फ्यूमध्ये हा प्रकार घडत असल्याने दुकानदारांमध्ये या दडपशाहीविरूद्ध रोष निर्माण होत आहे. शहरातील काही संघटनांनी तसे पत्र दिल्याने त्यांच्यासोबत इतरांनाही भरडले जात असल्याने हा प्रकार तातडीने बंद करण्याची मागणी होत आहे.
जिल्ह्यात सध्या जनता कर्फ्यूचे आवाहन करण्यात आले आहे. त्यानुसार जनता व व्यापाऱ्यांनी त्यामध्ये स्वेच्छेने सहभागी व्हावयाचे आहे. त्यासाठी कोणतीही कायदेशिर सक्ती नाही.


पत्र देणाऱ्यांवर सक्ती करा

शहरातील काही व्यावसायिक संघटनांनी त्यांच्या वैयक्तिक सुरक्षेसाठी व्यापार मर्यादित काळातच सुरू ठेवण्याचे पत्र प्रशासनासह पोलिसांना दिले आहे. त्यांनी त्यांच्या मर्जीने व्यवसायाबद्दल निर्णय घेतला आहे. त्यांची दुकाने किती वाजेपर्यंत सुरू ठेवावी, हा त्यांचा विषय आहे. त्यांच्यासाठी इतरांचा व्यवसाय बंद करू नये, अशी मागणीही दुकानदारांकडून होत आहे.


आदेश नसतानाही दडपशाही
दुकाने सायंकाळी पाच वाजताच बंद करण्याचा जिल्हाधिकाºयांचा कोणताही आदेश नाही. त्यामुळे काही दुकानदारांनी नगर परिषद, पोलिसांना आदेश दाखवण्याची मागणी केली जाते. त्याउलट दुकानदारानाच दुकाने सुरू ठेवण्याचा आदेश मागितला जातो. हा उफराटा प्रकारही दडपशाहीमध्ये सुरू आहे. या प्रकाराला तातडीने पायबंद घालण्याची मागणी व्यावसायिकांसह दुकानदारांकडून होत आहे.

Web Title: Forced to close shops in Khamgaon

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.