विहिरीत पडलेल्या अस्वलास वन विभागाने दिले जीवदान!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 11, 2021 11:26 AM2021-02-11T11:26:30+5:302021-02-11T11:26:46+5:30

Bear falls into a well एका शेतातील विहिरीत पडलेल्या अस्वलास वाचविण्यात वनविभागाच्या बचाव पथकास यश आले आहे.

Forest department gives life to a bear that falls into a well! | विहिरीत पडलेल्या अस्वलास वन विभागाने दिले जीवदान!

विहिरीत पडलेल्या अस्वलास वन विभागाने दिले जीवदान!

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
बुलडाणा: ज्ञानगंगा अभयारण्याच्या लगत असलेल्या डोंगरशेवली शिवारात रात्री  एका शेतातील विहिरीत पडलेल्या अस्वलास वाचविण्यात वनविभागाच्या बचाव पथकास यश आले आहे. दरम्यान, या अस्वलास नंतर ज्ञानगंगा अभयारण्यात सोडण्यात आले.
चिखली तालुक्यातील किन्होळा येथील रहिवासी पाटीलबुवा भिवसन बाहेकर यांचे डोंगरशेवली शिवारातील गट क्र.  ३१६ मध्ये शेत आहे. या शेतातील विहिरीत  अस्वल पडले असल्याचे सकाळी स्थानिकांच्या निदर्शनास आले. त्यानंतर याची माहिती स्थानिकांनी वनविभागाला दिली. त्यांतर उपवन संरक्षक अक्षय गजभिये, एसीएफ रणजीत गायकवाड यांच्या निर्देशानुसार बुलडाणा वन विभागाचे बचाव पथकातील कर्मचारी वनपाल राहुल चव्हाण, संदीप मान्टे, विलास मेरत, संदीप मडावी व अन्य कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले. त्यापूर्वी घटनास्थळाचा परिसर या बचाव पथकाने निर्मनुष्य केला. जेणेकरून कुठलीही अप्रिय घटना घडणार नाही, या दृष्टीने ही खबरदारी घेण्यात आली.  त्यानंतर विहितीत बाज टाकून अस्वलास बाहेर काढण्याचे प्रयत्न झाले. त्यात यश न आल्यामुळे विहीरीत पिंजरा टाकण्यात आला व बऱ्याच परिश्रमानंतर  अस्वल पिंजऱ्यात शिऱल्यावर तो बाहेर काढण्यात आला. त्यानंतर या अस्वलास लगतच्या ज्ञानगंगा अभयारण्यात सुखरूपपणे सोडण्यात आले.  ज्ञानगंगा अभयारण्याच्या लगतच्या भागात वन्य प्राणी विहीरीत पडल्याच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे. 

Web Title: Forest department gives life to a bear that falls into a well!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.