वनजमिनीवर अतिक्रमण करणाऱ्यास अटक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 24, 2021 04:32 AM2021-05-24T04:32:58+5:302021-05-24T04:32:58+5:30
पीक कर्ज भरण्यास मुदतवाढ द्यावी बुलडाणा : शेतकऱ्यांनी बँकांकडून बिनव्याजी कर्ज घेतले आहे. या कर्जाची परतफेड करण्याची मुदत ३१ ...
पीक कर्ज भरण्यास मुदतवाढ द्यावी
बुलडाणा : शेतकऱ्यांनी बँकांकडून बिनव्याजी कर्ज घेतले आहे. या कर्जाची परतफेड करण्याची मुदत ३१ मार्च होती. मात्र, कोरोनामुळे अनेक दिवस बँक बंद होती. त्यामुळे पैसे भरण्याची मुदत ३० जूनपर्यंत वाढवावी, अशी मागणी हाेत आहे.
दाेन गावांसाठी टॅंकर मंजूर झाल्याने दिलासा
माेताळा : तालुक्यातील टेकडी तांडा आणि पाेफळी या गावांसाठी पिण्याच्या पाण्याचे टॅंकर मंजूर करण्यात आले आहेत. टेकडी तांडा येथे ३५० लाेकसंख्येसाठी एक तर पाेफळी येथे दाेन टॅंकर मंजूर करण्यात आले आहेत.
मिरचीचा उन्हाळी हंगाम सुरू
धामणगाव धाड : परिसर मिरचीचे माहेरघर म्हणून ओळखला जाताे. मागील वर्षी पडलेल्या पावसामुळे सिंचन प्रकल्प, तसेच विहिरीत मुबलक पाणीसाठा असल्याने शेतकरी ठिबक सिंचनाद्वारे मिरचीचे पीक घेतात. सध्या परिसरात मिरची पिकाची लागवड करण्यास सुरुवात झाली आहे.
कृषिपंपांचा विद्युत पुरवठा रात्री सुरू ठेवा
मेहकर : कोरोनाच्या भीतीने शेतात राहणाऱ्या शेतकऱ्यांसाठी अखंड विद्युत पुरवठा राहावा, म्हणून कृषिपंप फिडरवरील विद्युत पुरवठा रात्रीही करण्यात यावा, अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे.
शेतमाल व्यापाऱ्यांना शिथिलता द्या!
धामणगाव बढे : कोरोनाच्या वाढत्या संकटामध्ये देशाच्या अर्थव्यवस्थेचा कणा बनलेल्या शेतकऱ्यांच्या अडचणीमध्ये वाढ होताना दिसत आहे. बंदच्या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांचे आर्थिक व्यवहार ठप्प झाले असून, तोंडावर आलेल्या पावसाळ्यात शेतीची मशागत करताना, बियाण्यांची व खतांची जुळवाजुळव करताना शेतकऱ्यांची मात्र दमछाक होत आहे.
ग्रामीण भागात लसीकरणासाठी रांगा
साखरखेर्डा : प्राथमिक आरोग्य केंद्रात लस उपलब्ध होत नसल्याने कर्मचारी वैतागले असून, नागरिकांना लसीकरणासाठी रांगा लावाव्या लागत आहेत. ४५ पेक्षा जास्त वय असणाऱ्या व्यक्तींना लसीअभावी परत जावे लागत असल्याचे चित्र साखरखेर्डा प्राथमिक आरोग्य केंद्रात पाहावयास मिळाले.
१०८ रुग्णवाहिका ठरली जीवनदायी
बुलडाणा : जिल्ह्यात २३ अत्याधुनिक रुग्णवाहिका कार्यरत असून, मार्च, २०२० ते फेब्रुवारी, २०२१ या ११ महिन्यांत तब्बल १ लाख ४२ हजार ३६८ कोरोना संक्रमितांना उपचारासाठी पोहोचवून या रुग्णवाहिका जीवनदायी ठरल्याचे दिसून येते.
सिटी स्कॅनचे शासकीय दर नावालाच
बुलडाणा : शहरासह जिल्ह्यात महिन्याकाठी चार ते पाच हजारांवर सिटी स्कॅन केले जात आहेत. मात्र, शासकीय दराऐवजी मनमानी पद्धतीने सिटी स्कॅनसाठी दराची आकारणी केली जात असल्याचे वास्तव समोर येत आहेे.
सांडपाण्याचा निचरा करण्याची मागणी
डोणगाव : नालीतील सांडपाण्याचा व्यवस्थित निचरा होत नसल्याने डासांचे प्रमाण वाढले आहे. त्यामुळे आरोग्याच्या समस्या निर्माण झाल्या आहेत. त्यामुळे सांडपाण्याची व्यवस्था करण्याची गरज आहे.
डम्पिंग ग्राउंड हाऊसफुल्ल
बुलडाणा : शहरातीलच नव्हे, तर इतर शहरातील कचरा टाकण्यात येत असलेले डम्पिंग ग्राउंड आता हाऊसफुल्ल झाले आहे. यामुळे शहरातून जाणारा कचरा चक्क रस्त्यावर टाकण्यात येत असल्याचे दिसून येत आहे.
काेराेनाविषयक नियमांकडे होतेय दुर्लक्ष
सुलतानपूर : काेराेनाविषयक नियमांकडे दुर्लक्ष होताना दिसत आहे. फिजिकल डिस्टन्सिंग पाळणे, मास्क वापरणे, साबणाने हात धुणे गरजेचे आहे, परंतु नागरिक सर्रास रस्त्यावर गर्दी करीत आहेत. स्थानिक प्रशासनाने याकडे लक्ष दिले पाहिजे.
मेंहदीऐवजी सॅनिटायझर लावण्याची वेळ
जानेफळ: काेराेनामुळे शासनाने विवाह सोहळ्यांवर कडक निर्बंध लागू केले आहेत. ठरलेले विवाह सोहळे रद्द करून पुढे ढकलण्याची वेळ आली असून, यामुळे मेहंदी लावायच्या हातावर सॅनिटायझर लावण्याची वेळ आली आहे.
दरेगावसाठी टँकर मंजूर झाल्याने दिलासा
सिंदखेड राजा: तालुक्यातील दरेगाव येथील पाणीटंचाईची तीव्रता लक्षात घेता, या गावासाठी पाणीपुरवठ्याकरिता टँकर मंजूर करण्यात आले आहे. दरेगाव येथील २ हजार ३२८ लोकसंख्या करिता एक टँकर ६२ हजार ४२० लीटर पाणीपुरवठा करणार आहे.