अडीच हजाराची लाच घेताना वनरक्षकाला अटक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 15, 2021 12:07 PM2021-07-15T12:07:04+5:302021-07-15T12:07:10+5:30

Forest ranger arrested for accepting bribe : अडीच हजार रुपयांची लाच घेताना प्रादेशिक वनविभागातील वनरक्षक कृष्णा जुंबडे यास बुलडाणा एसीबीने बुधवारी सायंकाळी अटक केली. 

Forest ranger arrested for accepting bribe of Rs 2,500 | अडीच हजाराची लाच घेताना वनरक्षकाला अटक

अडीच हजाराची लाच घेताना वनरक्षकाला अटक

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
बुलडाणा: रेती व्यवसायासाठी वापरण्यात येणाऱ्या ट्रॅक्टरवर कारवाई न करता ते सोडून देण्यासाठी अडीच हजार रुपयांची लाच घेताना प्रादेशिक वनविभागातील वनरक्षक कृष्णा जुंबडे यास बुलडाणा एसीबीने बुधवारी सायंकाळी अटक केली. 
जळगाव जामोद येथील प्रादेशिक विभागाच्या वनपरिक्षेत्र कायार्लय परिसरात ही कारवाई बुधवारी सायंकाळी करण्यात आली. या संदर्भात जळगााव जामोद येथील ३२ वर्षीय व्यक्तीने तक्रार दिली होती. ही कारवाई एसीबीच्या पीआय ममता अफूने, विलास साखरे, महादेव चव्हाण, सुनिल राऊत, जगदीश पवार व त्यांच्या सहकार्यांनी एसीबीचे पोलीस उपअधीक्षक संजय चौधरी यांच्या मार्गदर्शनाखाली केली. गेल्या तीन दिवसात एसीबीने दोन प्रकरणात लाच घेणाऱ्यांना अटक केली आहे.

Web Title: Forest ranger arrested for accepting bribe of Rs 2,500

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.