अंतर्गत मतभेद विसरून पक्ष संघटनावाढीसाठी डाेस
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 6, 2021 04:38 AM2021-09-06T04:38:55+5:302021-09-06T04:38:55+5:30
चिखली शहर काँग्रेसच्या वतीने प्रदेश काँग्रेसने बुलडाणा जिल्हा अध्यक्षपदी माजी आमदार राहुल बोंद्रे यांची फेरनिवड, प्रदेश कार्यकारिणीत जिल्ह्यातून नऊ ...
चिखली शहर काँग्रेसच्या वतीने प्रदेश काँग्रेसने बुलडाणा जिल्हा अध्यक्षपदी माजी आमदार राहुल बोंद्रे यांची फेरनिवड, प्रदेश कार्यकारिणीत जिल्ह्यातून नऊ पदाधिकाऱ्यांची नियुक्ती झाल्याने ४ सप्टेंबर रोजी त्यांच्या सत्कार कार्यक्रमात ते बोलत होते. मागील काँग्रेस जिल्हाध्यक्ष पदाचा कार्यकाळ अत्यंत खडतर, कोरोनाचा असतानासुध्दा आपल्या जिवाची पर्वा न करता संपूर्ण जिल्हाभरात काँग्रेसला जिवंत ठेवण्याचे काम राहुल बोंद्रे यांनी केले असल्याचे राणा दिलीपकुमार सानंदा यांनी सांगितले. जिल्हाध्यक्ष पदाचा काटेरी मुकुट घालून तारेवरची कसरत करीत सर्व परीक्षांमध्ये यशस्वी झाले. आजवर पक्षाची जिवाभावाने सेवा केल्याचे सांगून जिल्ह्यात काँग्रेस मजबूत करण्याबरोबर पक्षश्रेष्ठींनी टाकलेल्या जबाबदाऱ्या यशस्वीपणे पार पाडल्याचे माजी आमदार तथा फेरनिवड झालेले जिल्हाध्यक्ष राहुल बोंद्रे यांनी सांगितले. येणारा काळ हा नगर परिषद, जिल्हा परिषद निवडणुकीचा म्हणजेच कार्यकर्त्यांच्या निवडणुकीचा काळ आहे. त्या दृष्टीने पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी वाटचाल करावी, ग्रामीण व शहरी भागातून युवा वर्ग मोठ्या संख्येने काँग्रेसमध्ये दाखल होत असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. यावेळी काँग्रेसचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
मोदी सरकारवर टीकास्त्र
या देशात संविधान असल्याने देशविघातक शक्तिंना रोखण्यात आले असून, केंद्रातील मोदी सरकारवर टीका करीत, सध्या लोकशाही जिवंत आहे की नाही, असा प्रतिप्रश्न उपस्थित करीत, येत्या काळात निवडणुकीच्या माध्यमातून अशा शक्तिंना धडा शिकविण्याचे काम करण्याची गरज असल्याचे मत विजय आंभोरे यांनी यावेळी व्यक्त केले.