माजी सरपंच, सचिवाने गैरप्रकार केल्याची तक्रार - A
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 27, 2021 04:35 AM2021-03-27T04:35:47+5:302021-03-27T04:35:47+5:30
मासरूळ येथे दलित वस्ती अंतर्गत झालेल्या कामामध्ये प्रत्यक्ष काम न करताच देयकाची अदायगी केलेली असून थोड्याफार प्रमाणात जी ...
मासरूळ येथे दलित वस्ती अंतर्गत झालेल्या कामामध्ये प्रत्यक्ष काम न करताच देयकाची अदायगी केलेली असून थोड्याफार प्रमाणात जी कामे करण्यात आलेली आहेत, त्या कामामध्ये कसलीही गुणवत्ता नसल्याचा आराेप निवेदनात केला आहे. तसेच दलित वस्ती अंतर्गत कामे घेताना ती दलित वस्तीमध्ये घेणे अपेक्षित असताना दुसऱ्याच ठिकाणी करण्यात आली आहे. सन २०१५ ते २०२० पर्यंत १४ व्या वित्त आयोगांतर्गत गावामध्ये व्यायामशाळा साहित्य खरेदी, मैदान तयार करणे, वाचनालय साहित्य, इलेक्ट्रिक लाइट खरेदी, नाली बांधकाम ई. कामामध्ये प्रत्यक्ष साहित्य खरेदी न करताच उपप्रमाणके आणून देयके अदा करण्यात आल्याचा आराेप निवेदनात केला आहे. नवीन अंगणवाडी बांधकामामध्ये अतिशय निकृष्ट दर्जाचे साहित्य वापरून बांधकाम करण्यात आले आहे. विकासकामातील गैरप्रकाराची चाैकशी करून दाेषीवर कारवाई करण्याची मागणी निवेदनात केली आहे. निवेदनावर सरपंच शंकुलता महाले यांच्यासह शेषराव सावळे ग्रा.पं. सदस्य, दिलीप सीनकर पं.स. सदस्य, रुख्मिणीबाई दादाराव काटोले उपसरपंच, सुरेखा नंदकिशोर देशमुख सदस्य, ताराबाई सुभाष फुसे सदस्य, संगीता किरण उगले, शिवगंगा सुभाष पवार, बाळू गोविंदा सपकाळ, मधुकर महाले, संभाजी देशमुख, सुभाष पवार हिंमत पवार, दादाराव सावळे, संदीप सपकाळ, दादाराव महाले, विश्वनाथ महाले, डिगंबर महाले, ज्ञानेश्वर गुळवे आदींची स्वाक्षरी आहे.
मासरूळ ग्रामपंचायतच्या कामात कुठल्याही प्रकारचा गैरव्यवहार झालेला नसून शासन नियमाप्रमाणे दाजपत्रकानुसार कामे केलेली आहेत.
- एम.आर. गवते, ग्रामविकास अधिकारी