राजूर घाटात आढळला वृद्धाचा मृतदेह
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 28, 2017 01:30 AM2017-09-28T01:30:17+5:302017-09-28T01:30:44+5:30
बुलडाणा : रायपूर येथील रहिवासी असलेल्या एका ८0 वर्षीय इसमाचा कुजलेल्या अवस्थेतील मृतदेह २७ सप्टेंबर रोजी सकाळी राजूर घाट परिसरात आढळून आला. रायपूर पोलीस स्टेशनमध्ये मिसिंग तक्रारीवरून सदर इसमाची ओळख पटविण्यात आली असून, मोहम्मद इसाक मोहम्मद अकबर (वय ८0 वर्षे) असे मृताचे नाव आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
बुलडाणा : रायपूर येथील रहिवासी असलेल्या एका ८0 वर्षीय इसमाचा कुजलेल्या अवस्थेतील मृतदेह २७ सप्टेंबर रोजी सकाळी राजूर घाट परिसरात आढळून आला.
रायपूर पोलीस स्टेशनमध्ये मिसिंग तक्रारीवरून सदर इसमाची ओळख पटविण्यात आली असून, मोहम्मद इसाक मोहम्मद अकबर (वय ८0 वर्षे) असे मृताचे नाव आहे. मृताच्या मुलानेदेखील मृतदेहाची ओळख पटवली आहे. मलकापूर रोडवरील उप-प्रादेशिक परिवहन कार्यालयाच्या समोरील असलेल्या राजूर घाटाच्या दरीत एका इसमाचा मृतदेह पडलेला असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. डीवायएसपी महामुनी, पीएसआय सुनील जाधव, पीएसआय मुकुंद देशमुख तत्काळ घटनास्थळी दाखल झाले. मृतदेहाची ओळख पटविण्यासाठी घटनास्थळावर कुठलाच पुरावा उपलब्ध नसल्याने पोलिसांनी जिल्हाभरात दाखल असलेल्या मिसिंग तक्रार तपासून पाहिल्या असता, मृतदेहाच्या वर्णनाशी मिळती- जुळती मिसिंग रायपूर पोलीस स्टेशनमध्ये दाखल असल्याचे पोलिसांच्या लक्षात आले.
त्यानुसार तत्काळ नातेवाइकांना याची माहिती देऊन ओळख पटविण्यासाठी घटनास्थळावर बोलविण्यात आले. मृताच्या मुलाने सदर व्यक्तीची ओळख पटविली असल्याने मृतदेह मोहम्मद इसाक मोहम्मद अकबर यांचा असल्याचे निष्पन्न झाले.