विहिरीत आढळले मृत बिबट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 19, 2017 07:11 PM2017-07-19T19:11:09+5:302017-07-19T19:46:38+5:30

लोणार : तालुक्यातील टिटवी परिसरात ज्ञानेश्वर चिभडे यांच्या शेतातील विहिरीत मृत अवस्थेत बिबट्या आढळून आल्याची घटना १९ जुलै उघडकीस आली.

Found dead well in the well | विहिरीत आढळले मृत बिबट

विहिरीत आढळले मृत बिबट

googlenewsNext

लोकमत न्यूज नेटवर्क
लोणार : जागतीक पर्यटन स्थळ लोणार सरोवर परिसरातील चंदनाच्या लाकडावरील मांसाहरी मेजवानीची घटना ताजी असतानाच तालुक्यातील टिटवी परिसरातील ज्ञानेश्वर चिभडे यांच्या शेतातील विहिरीत मृत अवस्थेत बिबट्या आढळून आल्याची घटना १९ जुलै उघडकीस आली.
तालुक्यातील टिटवी परिसरात ज्ञानेश्वर चिभडे यांचे शेत आहे. काही दिवसांपासून परिसरात बिबट फिरत असल्याचे त्यांनी वनविभागाला कळविले होते. परंतु संबंधित वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी याकडे दुर्लक्ष केले. यादरम्यान शेतातील कुत्रा बिबट्याने खाल्ला. यामुळे बिबट्याचा बंदोबस्त करावा, अशी मागणी ज्ञानेश्वर चिभडे यांनी तोंडी केली होती. मात्र कोणतीही कारवाई वनविभाग अधिकारी यांचेकडून झाली नाही. १९ जुलै रोजी शेतात गेले असता ज्ञानेश्वर चिभडे यांना विहिरीत बिबट मृत अवस्थेत आढळून आला. माहिती मिळताच आरएफओ पी.बी.सानप, वनपाल ए.पी.वरणकर, आर.बी. पवार, वनरक्षक सि.एन.लद्धड यांनी घटनास्थळी धाव घेतली. जागतीक पर्यटन स्थळ लोणार सरोवर परिसरात चंदनाच्या झाडावर शिजवून रंगलेली मांसाहारी मेजवाणी गरम असतानाच टिटवी परिसरात विहिरीत पडून बिबट्याचा मृत्यू झाल्याने वनविभागाच्या अधिकाऱ्यांच्या कार्यशैलीवर प्रश्नचिन्ह उभे राहत आहेत.

विहिरीत पडून मृत्यू झालेला बिबट्याला ताब्यात घेतले असून शवविच्छेदनासाठी पाठविले जाणार आहे. शवविच्छेदनाच्या रिपोर्टवरुन मृत्यूचे कारण कळेल.
- ए.पी.वरणकर, वनपाल, टिटवी.

 

Web Title: Found dead well in the well

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.